५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुमच्या फ़ेसबूक अकाउंट(Facebook Account) चा बॅकअप कसा घ्याल?

इंटरनेटच्या जगात कधीही काही सुरक्षित नसते तुमचे फ़ेसबूक अकाउंट सुद्धा नाही....एक दिवस  तुम्ही तुमच्या फेसबूक अकांउट वर लॉग-इन करण्याचा प्रयत्न करत असाल..अचानक तुम्हाला असे कळले की तुमचे फेसबूकचे खाते उघडत नाही आहे..ते बॅन झाले आहे..तर तुम्ही काय कराल?..म्हणजे आता पर्यंत तुम्ही अपलोड केलेले फोटो,व्हिडिओ,तुमच्या मित्र परिवाराची माहिती,तुमचे वॉल पोस्ट सर्व काही एका क्षणात नाहीसे :-(..  ते कधीच परत नाही मिळणार?? :-( ..
आता काय करावे बरे??? घाबरू नका..यावर पण उपाय आहे..तो म्हणजे तुमच्या फेसबूक अकाउंटचा बॅकअप घेणे..फेसबूकने तशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. :-)

CO.CC:Free Domain

तुमच्या फेसबूक अकाउंटचा "Account Settings" मध्ये जावून "Download Your Information" पर्यांया समोरील " learn more" वर क्लिक करा.


जी नविन विंडो ओपन होईल त्यात तुम्हाला "Get a copy of the data you've put on Facebook " व त्या संबंधीची माहिती वाचता येईल..त्याच पानावर तळाला "Download" नावाचा पर्यांय दिसेल..त्यावर क्किक करा.


आता "Request My Download" नावाची एक नविन विंडो ओपन होईल.
तिथे ""Download" या पर्यांया वर क्लिक केल्यावर "You will receive an email when your archive is ready for download" असा मजकूर फ़ेसबूक मार्फत दाखवला जाईल.आता काही वेळाने तुमच्या इमेल अकाउंट वर फेसबूक मार्फत एक मेल येईल त्यामध्ये तुमच्या अकांउटचा संपूर्ण बॅकअप ".zip" Format मध्ये असेल..


तो तुम्ही डाउनलोड करून सुरक्षित ठिकाणी ठेवू शकता..फक्त या गोष्टीची काळजी घ्या की हि फाईल कोणाच्या हाती लागणार नाही.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर :-)
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment