५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुमचा ब्लॉग(Mobile Friendly) मोबाईल वर वापरण्याजोगा कसा बनवाल?

 सद्ध्या मोबाईलचा वापर वाढत चालला आहे,इंटरनेटचे रेट सुद्धा कमी कमी होत चालले आहेत,त्यामुळे स्मार्टफोन,मोबाईलचा वापर हल्ली इंटरनेटच्या वापरासाठी सहज केला जातो.मग तुमचा ब्लॉग अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचला पाहिजे असे तुम्हाला वाटत असेल,तर तुमचा ब्लॉग Mobile Friendly आहे का? कारण मोबाईल नेटचा स्पीड बराच हळू असतो,त्यामुळे तुमचा ब्लॉग वाचकानी वाचावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर तो  मोबाईल वर वापरण्याजोगा  बनवणे आवश्यक आहे, ते खुप सोप्पे आहे.ब्लॉगर.कॉम ने काही नविन सेवा-सुविधा दिल्या आहेत त्यांच्या मदतीने तुम्ही ते सहज करू शकता.

हे कसे कराल?



१)प्रथम तुमच्या ब्लॉगर.कॉमच्या account वर लॉग-इन व्हा.

२)ब्लॉगर.कॉमने दिलेल्या नविन सेवा-सुविधा  वापरण्यासाठी तुम्हाला Blogger in Draft  या पर्यांयाचा वापर करावा लागेल.
त्यासाठी http://draft.blogger.com/home वर जा

३)चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला Make Blogger in Draft my default dashboard नावाचा पर्यांय दिसेल त्या समोर टिचकी द्या.


४)मग तुमच्या ब्लॉगच्या Settings मध्ये जावून Email & Mobile या पर्यांयावर टिचकी द्या.

५)खाली दिलेल्या चित्राप्रमाणे Yes, On mobile devices, show the mobile version of my template. समोर टिचकी देवून,MOBILE PREVIEW वर टिचकी द्या.


६)माझ्या ब्लॉगचा MOBILE PREVIEW

७)शेवटी Save Settings  पर्यांयावर टिचकी द्यायला विसरू नका,


८)ब्लॉगिंगचे तंत्र-मंत्र जाणून घेण्यासाठी तुम्ही ब्लॉगिंगचे तंत्र-मंत्र हा विभाग पाहू शकता.
धन्यवाद
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.
CO.CC:Free Domain
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment