५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुमची ऑनलाइन प्रतिष्ठा (online reputation)कशी धुळीत मिळवाल?

 शिर्षक वाचून चपापलात ना? :-)

It take 20 years to Build a reputation
and five minutes to ruin it.
-warren Buffett.

 तुम्हाला तुमचे सामजिक स्थान,प्रतिष्ठा निर्माण करायला जर २० वर्षाचा कालावधी लागत असेल तर ती धुळीत मिळवण्यासाठी ५ मिनिट पण पुरेसे असतात.

तुमचे सामाजिक स्थान,प्रतिष्ठा ही अनेक बाबतीत महत्त्वाची ठरते.तुमचे नोकरी व्यवसायातले स्थान,तुमचे तुमच्या मित्र-परिवाराशी असलेले संबंध अश्या बर्‍याच गोष्टीचा यात संबंध येतो.त्यामुळे तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेला गेलेला तडा या सर्वांवर परिणाम करतो.

सध्याचे युग हे इंटरनेटचे,सोशलनेटवर्किगचे आहे,त्यामुळे तुमची ऑनलाइन प्रतिष्ठा देखिल तितकीच महत्त्वाची ठरते.खालील गोष्टींचा नीट काळजी घेतली नाही तर ती धुळीत मिळू शकते.

तुमची ऑनलाईन प्रतिष्ठा जपण्यासाठी खालील ३ घटकांचा काळजीपुर्वक विचार केला पाहिजे:१)Privacy खाजगी माहिती
२)Encryption:(तुमच्या माहितीचे सांकेतिक रुपांतरण)
३)योग्य निर्णय

१)खाजगी माहिती: तुम्ही जेव्हा एखाद्या सोशल नेटवर्कींग साईटवर नाव नोंदवता त्यावेळी ती साईट तुम्हाला तुमची खाजगी माहिती कश्या प्रकारे वापरली जाणार याची माहिती देते.तुम्ही ती काळजीपुर्वक वाचून त्याचा तुमच्या खाजगी आयुष्यावर काही परिणाम होईल का याचा विचार करून पुढचा निर्णय घेवू शकता.


त्यामुळे सोशल नेटवर्कींग साईटवर नाव नोंदवल्यावर लगेच तुम्ही तुमच्या खात्याची privacy Settings  बदलून तुमची माहिती कोणासोबत शेअर करायची कशी करायची,कितपत करायची याचा निर्णय घेवू शकता.योग्य ते बदल करून तुमची माहिती त्यानंतरच सेव्ह करा.
तुम्हाला ऑनलाईन खाते हे अनोळखी लोकाना मित्र बनवण्यासाठी,की कुटूंब-मित्रपरिवारासाठी खाजगी ठेवायचे आहे,याचा सुद्धा या मध्ये समावेश होतो.


एक गोष्ट कायम लक्षात असू द्या या ज्या फ्री ऑनलाईन सर्विस आहेत त्यांचे उत्पन्न हे तुम्ही आणि तुमच्या खाजगी माहितीवर अवलंबून असते.

 २)Encryption:(तुमच्या माहितीचे सांकेतिक रुपांतरण):

जेव्हा तुम्ही कोणतीही माहिती ऑनलाइन शेअर करता,मग ते तुमचे फोटो असोत अथवा व्हिडिओ अथवा इतर काहीही...,तुम्ही हे जाणून घेणे आवश्यक आहे की इंटरनेट कसे काम करते?..जेव्हा तुम्ही नेटवर काहीही करता तेव्हा तुमची माहिती तुमच्या संगणका मार्फत तुमच्या इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर (ISP) कडे जाते.तिथून ती वेगवेगळ्या ठिकाणच्या सर्वर वरून स्थानांतरीत होवून मगच शेवटच्या स्थानापर्यंत पोहोचते..याचा अर्थ असा होतो की तुमची जी माहिती योग्य पद्धतीचा वापर करून सुरक्षित केली गेलेली नाही आहे ती मधल्या मध्ये चोरली जाण्याची शक्यता जास्त आहे.याच्या वर उपाय एकच तो म्हणजे तुमच्या माहितीचे सांकेतिक भाषेत रूपांतरण करणे यालाच Encryption असेही म्हणतात..जितके हे रूपांतरण किचकट तितकी तुमची माहिती जास्त सुरक्षित असते. उदा. तुमचा पासवर्ड निवडताना संख्या,अक्षरे यांच्या जोडिला  @ # $ ! या चिन्हांचा वापर केल्यास तो जास्त किचकट होत असल्याने, अधिक सुरक्षा देतो.

३)योग्य निर्णय: ऑनलाइन काहीही करताना याचा विचार करणे जास्त गरजेचे आहे.तुम्हाला खरच अनोळखी ५००० मित्र-मैत्रिणींची गरज आहे का???तुम्ही तुमचा मोबाईल नंबर अनोळखी व्यक्तीला द्यावा की नाही??? तुम्ही जे काही तुमच्या फेसबूक वॉल वर पोस्ट करता ते नंतर कोणी वाचले तर तुम्हाला शरमल्या सारखे वाटेल का???
या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला शोधायची आहेत.
कोणतेही फोटो अपलोड करताना हा प्रश्न स्वत:ला नक्की विचारा की माझ्या कुटूंबातील व्यक्तीने हे पाहिले तर त्यांना काय वाटेल?..जर याचे उत्तर त्याना ते आवडणार नाही असे असेल तर असे फोटो अपलोड करूच नका ना :-).
असे फोटो पोस्ट करू नका.
अश्या गोष्टी शेअर करू नका.
अथवा तुमच्या प्रोफाईल सोबत लिंक करू नका.
कारण अश्याच गोष्टी शेवटी तुमची सामजिक प्रतिष्ठा धुळीत मिळवतात....गूगल वर जर embarrassing facebook photos नावाने सर्च केलेत तर तुम्हाला अशी बरीच उदाहरणे मिळतील.
बघा विचार करा आणि सांगा तुमची माहिती खरच सुरक्षित आहे का?? :-)

                         
तुमची  सामजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी तुम्हाला योग्य ती काळजी रोजच घ्यावी लागते,
वर दिलेल्या ३ मुद्यांचा योग्य तो विचार करून वापर केला तर तुम्ही तुमची प्रतिष्ठा
व्यवस्थित सांभाळू शकता.
कारण आधीच लिहिल्या प्रमाणे "तुम्हाला तुमचे सामजिक स्थान,प्रतिष्ठा निर्माण करायला जर २० वर्षाचा कालावधी लागत असेल तर ती धुळीत मिळवण्यासाठी ५ मिनिट पण पुरेसे असतात." :-)

धन्यवाद.
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.
CO.CC:Free Domain
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment