५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुमच्या ब्लॉगसाठी अनुक्रमाणिका"Sitmap(Table of contents)"कशी लिहाल?

मित्रांनो तुम्ही रोज काहीना काही नविन लिहिता आणि काही काळाने तुम्ही लिहिलेले उत्तम लेख,नविन लिखानाची भर पडत गेल्याने मागे मागे पडत जातात,नविन वाचकाना ते वाचायला मिळत नाहीत अथवा फार शोधाशोध करावी लागते.बर्‍याच वेळा इंटरनेट वर तितका वेळ वाचकांकडे नसतो,त्यांना हवी ती माहिती लगेच हवी असते,मग यावर उपाय काय???? असे काही करता येईल का जेणे करून पुस्तकाप्रमाणे आपल्या ब्लॉगची ही अनुक्रमाणिका (Table of contents) असेल,म्हणजे
वाचकाना त्याना हवी ती माहिती विषयानुसार सहज उपलब्ध होईल,जणू काही ते एखाद्या पुस्तकाची (Table of contents)अनुक्रमाणिका पाहत आहे.

मित्रांनो मी यावर उपाय शोधला आहे,ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या स्वत:च्या ब्लॉगसाठी अनुक्रमाणिका सहज बनवू शकता. :-)
चला तर मग ५मिनिटामध्ये आपण ते सहज शक्य करु या.


उदा. म्हणून तुम्हा माझ्या ब्लॉगची अनुक्रमाणिका पाहू शकता.

*माझ्या ब्लॉगची अनुक्रमाणिका* Sitmap(TOC)


१)प्रथम तुमचे युसरनेम आणि पासवर्ड वापरून लॉग-इन व्हा.

२)तुमच्या Dashboard वरील तुमच्या ब्लॉगनुसार New Post नावाचा पर्यांय निवडा.

३)आता खाली दिलेले कोड कॉपी(ctrl+c) करून तुमच्या ब्लॉग पोस्टमध्ये पेस्ट(ctrl+v) करा.
**कोड मधील माझ्या ब्लॉगच्या नावाच्या जागी तुमच्या ब्लॉगचे नाव असा बदल करायला विसरू नका.


<script style="text/javascript" src="http://sites.google.com/site/chesslok/.js"></script><br /><script src="http://prashantredkarsobat.blogspot.com/feeds/posts/default?max-results=9999&alt=json-in-script&callback=loadtoc"></script>
४)तुमच्या ब्लॉगपोस्टला "अनुक्रमाणिका" असे नाव द्या.

५)आता तुमची ब्लॉग पोस्ट पब्लिश करा.

६)झाली तुमच्या ब्लॉगसाठी अनुक्रमाणिका"Sitmap(Table of contents) तयार.

७)आता तुमच्या ब्लॉगच्या साईडबार मध्ये तुम्ही लिंक लिस्ट पर्याय़ वापरून तुमच्या ब्लॉगसाठी तयार केलेल्या अनुक्रमाणिका"(Table of contents) ची लिंक देवू शकता.

८)आहे की नाही हे खुप सोप्पे. :-)
CO.CC:Free Domain

९)हा लेख आवडला तर प्रतिक्रिया नक्की द्या..
धन्यवाद.
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर :-)
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

  Blogger Comment
  Facebook Comment

6 comments:

 1. अतिशय उत्कृष्ठ माहिती. मी माझ्या ब्लॉगवर वापरली सुद्धा . फक्त एक बदल केला नविन पोस्ट ऐवजी नविन पेज वापरले. त्यामुळे साईड विजेटही आपोआप जोडता आले. माझ्या ब्लॉगवर हे तुम्ही पाहु शकता.

  http://blogsohamcha.blogspot.com/

  ReplyDelete
 2. माहितीचा वापर केल्या बद्दल धन्यवाद सोहम,प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद :-)
  तुमच्या ब्लॉग साठी फ़्री डोमेन नेम हवे असेल तर
  त्याची माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.
  http://prashantredkarsobat.blogspot.com/2011/01/free-domain.html
  प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद :-)

  ReplyDelete
 3. http://prashantredkarsobat.blogspot.com/2011/01/sitmaptable-of-contents.html
  या लेखातील ३ नंबर स्टेप मध्ये दाखविल्या प्रमाणे संपुर्ण कोड
  कॉपी(ctrl+c) करून तुमच्या ब्लॉग पोस्टमध्ये पेस्ट(ctrl+v) करा.
  **कोड मधील माझ्या ब्लॉगच्या नावाच्या जागी तुमच्या ब्लॉगचे नाव असा बदल करायला विसरू नका.
  फकत ब्लॉगचे नाव बदला बाकी सर्व तसेच राहू द्या
  मग ब्लॉग पोस्ट मध्ये edit html सिलेक्ट करून तो कोड पेस्ट करा आणि ती पोस्ट अनुक्रमाणिका म्हणून प्रसिद्ध करा.

  ReplyDelete
 4. mi anukramnika mazya blogwar aali aahe pan tyat shirshkachya link kashya jodaychya

  ReplyDelete
 5. आपण जेव्हा पोस्ट लिहितो,तेव्हा लेबल नावाचा जो पर्यांय आहे त्या मध्ये तुमच्या कविता ज्या विभागात मोडतात,त्या विभागाचे नाव द्या. उदा. प्रेम कविता,अथवा असेच काही, मग तुम्ही जेव्हा जेव्हा ते लेबल तुमच्या कवितेला जोडाल तेव्हा तेव्हा आपोआप ती कविता तुमच्या अनुक्रमाणिके मध्ये त्या विभागामध्ये दिसू लागेल.

  ReplyDelete