५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुमच्या मोबाईल वर येणारे नको ते कॉल आणि SMS कसे थांबवाल?

तुम्ही नविन नविन मोबाईल घेतलेला असतो आणि अचानक तुम्हाला तुमच्या मोबाईल सेवा पुरवणार्‍या कंपनी कडून नको त्या वेळी नको ते कॉल येतात...कधी कधी मार्केटिंग करणार्‍या कंपन्यांकडून sms चा भडीमार सुरु असतो...आणि यात होते काय? तर तुमचा महत्वाचा sms वाचायचाच राहून जातो.

हे सर्व कसे थांबवायचे हे नवख्या यूजरला कळतच नाही ते बिचारे हैराण होवून जातात अथवा वैतागून सर्व निमूटपणे सहन करतात.

हे सर्व तुम्ही कसे थांबवाल?


त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर Do Not Disturb Registry मध्ये रजिस्टर करावा लागेल. तसे करणे खुप सोप्पे आहे.
तुमच्या मोबाईल सेवा पुरवणार्‍या कंपनीला १९०९ या नंबर वर कॉल करून किंवा sms करून तुम्हाला हे सर्व थांबवता येईल.
आणि हा नंबर Toll Free असल्याने यावर केलेल्या कॉल अथवा sms साठी पैसे लागत नाहित.

१)SMS पद्धत वापरून: (Toll Free)
तुमचा नंबर रजिस्टर करण्यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये
START DND टाईप करा आणि तो SMS १९०९ या नंबर वर पाठवून द्या...तुमच्या मोबाईल सेवा पुरवणार्‍या कंपनी कडून तुम्हाला एक SMS येईल त्यात DND Registration चा नंबर असेल आणि येत्या ४५ दिवसात कंपनी कडून तुमच्या मोबाईल वर येणारे सर्व मार्केटिंगचे कॉल थांबविले जातील असा संदेश असेल.

जर तुम्हाला परत मोबाईल कंपनी कडून येणारे मार्केटिंगचे कॉल हवे असतील तर ,तुमचा नंबर deregister करण्यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये STOP DND टाईप करून तो SMS तुम्ही १९०९ या क्रमांकावर पाठवू शकता.

२)१९०९ या नंबर वर कॉल करून सुद्धा तुम्ही Do Not Disturb सेवेचा फायदा घेवू शकता आणि सर्व नकोते कॉल आणि SMS थांबवू शकता.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment