५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुमचे फेसबूक अकाउंट Deactivate / Delete कसे कराल?


मागच्या भागात आपण "फेसबूकचे तंत्र-मंत्र" मध्ये "१० फेसबूक privacy settings ज्या प्रत्येकाला माहित असायलाच पाहिजे." याची माहिती करून घेतली.आज आपण तुमचे फेसबूक अकाउंट Deactivate / Delete कसे कराल? याची माहिती करून घेणार आहोत.
फेसबूक हे जनसंपर्काचे प्रभावी माध्यम आहे,एकदा का तुम्ही फेसबूक अकाउंट बनवले की त्यात तुम्ही ५००० मर्यांदे पर्यंत मित्र-मैत्रिणी जोडू शकता.पण समजा तुम्हाला या सोशल नेटवर्किगचा कंटाळा आला.तर तुम्ही तुमचे फेसबूक अकाउंट Deactivate / Delete करून हे सर्व संपवू शकता.

हे कसे कराल?


१)तुमच्या फेसबूक अकाउंट वर लॉग-इन व्हा.

२)तुमच्या प्रोफाईलवर तुम्हाला उजव्या कोपर्‍याला ‘Account’ नावाचा पर्यांय दिसेल,त्यातील ‘Account Settings’ मध्ये जावून Deactivate Account समोरील Deactivate वर टिचकी द्या.

३)असे केल्यावर फेसबूक कडून तुम्हाला अकाउंट Deactivate करण्याचे कारण विचरले जाईल.एकतर तुम्ही दिलेल्या पर्यांयातून एक निवडा अथवा स्वत:चे कारण काय ते सांगा.

४)कारण लिहून झाल्यावर Deactivate Button वर टिचकी द्या.

५)असे केल्यावर तुम्हाला confirmation चे पान दिसेल ज्यावर तुम्हाला परत एकदा खरेच तुम्हाला तुमचे फेसबूक अकाउंट terminate करायचे आहे का?असे विचारले जाईल.

पुढच्या लेखात आपण "तुमचे Deactivate / Delete केलेले फेसबूक अकाउंट परत कसे मिळवाल?" याची माहिती करून घेणार आहोत.
धन्यवाद.
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

2 comments:

  1. mala fecebook var marathi typing karayache aahe

    ReplyDelete
  2. http://www.google.com/transliterate/marathi चा वापर करा अथवा माझ्या साईट वरील मराठी लिहा हा दुवा वापरा

    ReplyDelete