मित्र-मैत्रीणींनो,आता पर्यंत ब्लॉगिंगचे तंत्र-मंत्र मध्ये आपण बर्याच बाबींची माहिती करून घेतली.अजुनही खुप काही जाणून घेणे गरजेचे आहे,हळूहळू आपण मिळून सर्व गोष्टींची माहिती करून घेवू.
आज आपण पाहणार आहोत,तुमच्या ब्लॉगचा SMS चॅनेल कसा बनवाल?
मित्रांनो,आजकाल मोबाईलचा वापर वाढला आहे,त्यामुळे तुमच्या ब्लॉग वर जे काही नविन पोस्ट होते त्याची माहिती तुमच्या ब्लॉगच्या अथवा वेबसाईटच्या वाचकांना करून देणे आता अधिक सोप्पे झाले आहे.गूगलने तुम्हाला तुमच्या ब्लॉगचा SMS चॅनेल बनवू देण्याची सेवा उपलब्ध करून दिली आहे,ती सुद्धा अगदी मोफत!तुम्हाला ते SMS पाठवण्यासाठी अथवा आल्यावर पैसे द्यावे लागणार नाहीत.तुमच्या ब्लॉग अथवा साईट व्यतिरिक्त तुमच्या मित्रपरिवाराच्या संपर्कात राहण्यासाठी सुद्धा तुम्ही स्वत:चा SMS चॅनेल बनवू शकता.
या मोफत सेवेचा लाभ कसा घ्याल?
१)प्रथम तुमच्या गूगल खात्यावर लॉगइन व्हा.
२)त्यानंतर खाली दिलेल्या लिंक वर टिचकी द्या.

त्या मध्ये तुमचा मोबाईल नंबर इंटर करा.गूगल कडून तुम्हाला एक Verification कोड येईल.तो Verification कोड समोरील रिकाम्या जागेत भरून मग Finish Setup वर टिचकी द्या
३)आता चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे My Channels पर्यांया वर टिचकी द्या.
त्या नंतर create या पर्यांया वर टिचकी द्या.
४)जे नविन पान उघडेल त्यात तुमच्या ब्लॉगची अथवा साईट्ची संपुर्ण माहिती द्या.
५)आता तुमचा SMS चॅनेल तयार झाला.
६)पुढील पानावर तुम्हाला तुमच्या SMS चॅनेलची माहिती दिसेल आणि त्याच पानावर
चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे Subscription link for this channel: नावाचा पर्यांय दिसेल.
७)तिथून ती लिंक कॉपी करून तुमच्या ब्लॉगच्या साईडबार मध्ये ठेवा अथवा तुमच्या मित्रपरिवाराला मेल करा.
८)माझ्या ब्लॉगचा SMS चॅनेल तुम्ही साईडबार मध्ये पाहू शकता अथवा माझ्या ब्लॉगवरच्या नोंदी तुम्हाला मोबाईल वर मिळाव्या यासाठी खाली दिलेल्या लिंक वर टिचकी द्या.
इथे टिचकी द्या.
इथे टिचकी द्या.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.
0 comments:
Post a Comment