मित्रांनो,तुम्हाला माहित असेल की ऑर्कुट वर आपण प्रोफाईलचे द्रृश्यरूप बदलू शकतो,पण फेसबूक सारख्या इतर सोशल नेटवर्किग साईटनी अजुन अशी सेवा उपलब्ध करून दिलेली नाही.पण मी सुचवलेले तंत्र वापरून तुम्ही तुमच्या फेसबूक प्रोफाइलचा चेहरामोहरा सहज बदलू शकता.गूगलच्या पानाचे रूप बदलू शकता. ते ही केवळ २-३ मिनिट मध्ये ;)
हे कसे कराल?
ही युक्ती वापरण्यासाठी तुम्हाला दोन गोष्टींची गरज लागेल.
१)Mozzilla firefox browser
२) Addon
खाली दिलेली पद्धत वापरून तुम्ही ते सहज करू शकता.
१)प्रथम तुमचा Mozzilla firefox browser उघडा...जर तो तुमच्या संगणकावर इनस्टॉल नसेल तर खाली दिलेल्या लिंक वरून तो डाऊनलोड करून इनस्टॉल करा.
२)त्या नंतर खाली दिलेल्या लिंक वरून Addon डाऊनलोड करून इनस्टॉल करा.
३)installation पुर्ण झाल्यावर तुमचा Mozzilla firefox ब्राउजर पुन्हा सुरू करा.
४)themes इनस्टॉल करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जावून हवे ते theme निवडून इनस्टॉल करा.
कसे करायचे त्या साठी खाली दिलेले चित्र बघा.
*चित्रा मध्ये दाखविल्या प्रमाणे हवे ते theme निवडा.
उदा. facebook-style
मग जी लिंक उघडेल त्यातील Install With stylish पर्यांया वर टिचकी द्या.
असे केल्याने ते theme इनस्टॉल होईल आणि तुम्ही जेव्हा फेसबूक वर Login कराल तेव्हा तुम्हाला तुमचे फेसबूक प्रोफाईल खालील चित्रा प्रमाणे दिसेल.
अश्या प्रकारे तुम्ही ४५ सुंदर सुंदर Themes इनस्टॉल करू शकता.
५)तुमच्या गूगल पानाचे रूप बदलण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरील Theme इनस्टॉल करा..असे केल्याने तुमचे गूगल चे पान चित्रा मध्ये दाखविल्या प्रमाणे दिसेल.
६)Mozzilla firefox ब्राउजरच्या Tools>Addons>Stylish मध्ये जावून तुम्ही Options वर टिचकी देवून हवे ते Theme तुम्हाला हवे तेव्हा Enable किंवा Disable करू शकता.
धन्यवाद,
तुमचा मित्र
प्रशांत दा. रेडकर.
0 comments:
Post a Comment