मित्रानो आता पर्यंत आपण बर्याच ब्लॉगिंगच्या तंत्र-मंत्राची माहिती घेतली..पण या गोष्टि खुपच सामान्य होत्या,ज्या नवख्या ब्लॉगर्सना मदत करण्यासाठी होत्या.आता हळूहळू आपण अधिक प्रगत तंत्र-मंत्राची माहिती करून घेवू या.
मित्रानो जर तुम्ही तुमच्या अनुदिनीच्या पोस्टची पार्श्वभूमी(background) दर वेळी बदलू शकलात तर ते एकतर सुंदर दिसेल आणि दुसरे म्हणजे तुमच्या ब्लॉगच्या रूपरंगाला जो तोचतोचपणा दिसतो तो देखिल नाहिसा होईल..दर वेळी विषयाला अनुरूप अशी पार्श्वभूमी तुम्ही तुमच्या ब्लॉगसाठी निवडू शकाल.
१)प्रथम तुमच्या ब्लॉगच्या Settings मध्ये जा आणि मग Formatting वर टिचकी द्या.
२)तिथे तळाला तुम्हाला Post Template नावाचा पर्यांय दिसेल.
त्या समोरील रिकाम्या जागे मध्ये चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे दिलेला कोड कॉपी(crtrl+c) करून पेस्ट(ctrl+v) करा.
<div style="background:url(LINK_OF_PICTURE) no-repeat;"> </div>
३)त्या नंतर Save Settings वर टिचकी द्या.
४)आता Posting वर टिचकी द्या आणि New Post वर जा.
५)मग Edit HTML हा पर्यांय निवडा.
६)असे केल्याने मघाशी जो कोड आपण समाविष्ट केला तो आपल्याला दिसेल.
त्यात LINK_OF_PICTURE या जागी तुमच्या चित्राची लिंक द्या.
८)जर तुम्हाला त्या चित्राची पुनरावृत्ती करायची असेल तर no-repeat समोरील no- काढून टाका.
९)आता तुम्हाला जे काही तुमच्या पोस्ट मध्ये लिहायचे आहे ते
</div>
च्या आधी लिहा.
१०)मग तुमच्या ब्लॉगची पोस्ट प्रसिद्ध करा.
११)परत भेटू
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
प्रशांत सर , तुमचा ब्लॉग हा अलिबाबाची गुहा आहे उपयुक्त माहितीने भरलेली. मला ती खूप उपयोगी ठरते.
ReplyDeleteधन्यवाद :-)
ReplyDeleteअधिकाधिक माहितीची वेळोवेळी भर पडेल.