कालच एक बातमी बघितली आणि रस्त्यावर उघडयावर विकले जाणारे पदार्थ खाण्याचे मी टाळतो ते योग्यच आहे हे पटले.मित्रानो हे असे उघड्यावर खाद्यपदार्थ विकणारे फेरीवाले,तुम्हा-आम्हा सर्वांच्या आरोग्याशी खेळतातच पण काल पाहिलेला प्रकार अगदी किळसवाणा आहे..हे पाहून तुम्ही रस्त्यावर पाणीपुरी अथवा तस्सम पदार्थ खाणे सुरु ठेवणार का? ते तुमचे तुम्ही ठरवा..
ठाण्यामध्ये एका पाणीपुरीवाला ज्या भांड्यातून ग्राहकाना पाणीपुरी
खाताना पाणी पिण्यासाठी देतो त्यात लघुशंका करताना पकडला गेला.खाली दिलेले चलचित्र बघा.त्याला फक्त १२०० रुपये दंड करून समज देवून सोडण्यात आले.
खाताना पाणी पिण्यासाठी देतो त्यात लघुशंका करताना पकडला गेला.खाली दिलेले चलचित्र बघा.त्याला फक्त १२०० रुपये दंड करून समज देवून सोडण्यात आले.
हा राजदेव लखन चौहान नावाचा पानीपुरीवाला गेली ४ वर्ष ठाण्याच्या नौपाडा भागात पाणीपुरी विक्रीचा धंदा करतो.पाणीपुरी खाण्यासाठी बर्याच लोकांची इथे रोज गर्दी असते. हा पानीपुरीवाला रोज पाणीपुरीचा रगडा बनवण्यासाठी अथवा पाणीपुरीत पाणी मिसळण्यासाठी जो लोटा वापरला जातो त्यामध्ये लघूशंका करत होता...बर्याच वेळा ग्राहक पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर या लोट्याचा वापर पाणी पिण्यासाठी करायचे.जागरूकतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.
आता तुम्ही ठरवा यापुढे रस्त्यावर खायचे किंवा नाही...
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment