५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुमच्या ब्लॉगच्या प्रत्येक पोस्ट खाली लेखकाचे नाव,फोटो आणि थोडक्यात माहिती देणारा बॉक्स कसा समाविष्ट कराल?

मित्र-मैत्रिणींनो आता पर्यंत ब्लॉगिंगचे तंत्र-मंत्र मध्ये आपण बर्‍याच गोष्टींची माहिती करून घेतली..आज आपण " ब्लॉगच्या प्रत्येक पोस्ट खाली लेखकाचे नाव,फोटो आणि थोडक्यात माहिती देणारा बॉक्स कसा समाविष्ट करायचे?" याची माहिती करून घेणार आहोत.


हे कसे कराल?
१)प्रथम तुमच्या ब्लॉगर खात्यावर लॉग-इन व्हा.

२)त्या नंतर ब्लॉगरच्या बदललेल्या नविन स्वरुपानुसार तुमच्या ब्लॉगच्या नावासमोरील घराच्या आकारच्या चिन्हावर टिचकी दिल्यावर जो Template पर्यांय दिसतो.त्याच्यावर टिचकी द्या.मग Edit Template  मध्ये जा

३)तिथे
]]></b:skin>
या टॅगचा शोध घ्या.

४)त्या नंतर खाली दिलेले कोड कॉपी(ctrl+c) करून वरील टॅगच्या आधी पेस्ट (ctrl+v) करा.

<style type='text/css'>                 
#Prashantredkarsobat Author Box {                 
background: none repeat scroll 0 0 #EDEDED;                  
padding: 10px;                   
margin-top:10px;}                   
.authoravatar {float:left;margin-right:10px;padding:4px;background:#ccc;border:1px solid #222222;}                 
.postauthor {float:left;}                 
</style>

५)आता त्याच पानावर
<data:post.body/>
या टॅगचा शोध घ्या.

६)यानंतर खाली दिलेले कोड कॉपी करून वरील टॅगच्या नंतर पेस्ट करा.

<div style='clear:both'/>             
                   
<div id='Prashantredkarsobat Author Box'>
                     
<!-- Author Bio-->
                     
<b:if cond='data:blog.pageType == "item"'>
                                        
<b:if cond='data:post.author == "NAME OF AUTHOR"'>
                         
<img class='authoravatar' height='39' src='IMAGE URL OF AUTHOR' width='39'/>
                         
<div class='postauthor'>                           
                           
<h3><a href='AUTHOR'URL Here'>NAME OF AUTHOR </a></h3>
                           
<p> NOTES ABOUT Your Self </p>
                         
</div>
                         
<div style='clear:both'/>    
                       
</b:if>

७) NAME OF AUTHOR=तुमचे नाव,
IMAGE URL OF AUTHOR=तुमचा फोटो असलेला वेबपत्ता
AUTHOR'URL Here= तुमच्या साईट अथवा सोशल नेट्वर्किग प्रोफाईलचा वेबपत्ता,
NAME OF AUTHOR= त्यावरचे तुमचे नाव,
NOTES ABOUT Your Self = तुमच्या विषयी थोडक्यात माहिती
असे बदल करायला विसरू नका.

अधिक नव-नविन तंत्र-मंत्र शिकण्यासाठी नेहमी भेट देत राहा आणि फेसबुक वरचे पान लाईक करायला विसरू नका.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

  Blogger Comment
  Facebook Comment

0 comments:

Post a Comment