मित्र-मैत्रिणींनो आज आपण फेसबुक चॅट फायरफॉक्स ब्राउजरच्या साईडबार मध्ये कसे समाविष्ट करायचे याची माहिती करून घेणार आहोत.असे केल्याने तुम्हाला तुमच्या फायरफॉक्स ब्राउजरच्या साईडबार मधून चॅट करणे शक्य होईल.
हे कसे कराल?
१)प्रथम तुमचा FireFox ब्राउजर उघडा.
आणि माऊसने right click करा,यानंतर New Bookmark पर्यांयाची निवड करून..खाली दिलेली माहिती भरा.(चित्र पहा)
Name: Facebook Chat
Location:http://www.facebook.com/presence/popout.php
Load this bookmark in sidebar (Optional) हा पर्यांय जर तुम्ही निवडलात तर तुम्हाला फेसबुक चॅट फायरफॉक्स ब्राउजरच्या साईडबार मध्ये दिसेल.
आणि जर निवडला नाहित तर पुर्ण ब्राउजर विंडो मध्ये फेसबुक चॅट उघडेल.
३)आता हे चॅट साईड्बार मध्ये उघडण्य़ासाठी Ctrl + B वापरा अथवा View>Sidebar>Bookmarks मध्ये जावून Facebook Chat वर टिचकी देवून तुमच्या फेसाबुक मित्रपरिवारा सोबत फेसबुक चॅट सुरु करा.
अश्या अनेक तंत्र-मंत्रांची माहिती करून घेण्यासाठी फेसबुक वरचे पान लाईक करायला विसरू नका.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment