मंडळी फेसबुक ही सोशल नेटवर्किंग साईट आहे,त्यामुळे अनोळखी व्यक्तीं कडून तुम्हाला अनेक मैत्रींच्या विनंत्या येत असतात,तुम्ही जर मुली असाल तर याचा अनुभव तुम्ही घेतलाच असेल :D....कधी कधी अश्या मैत्रीच्या विनंत्या डोकेदुखी ठरतात..मग या मैत्रीच्या विनंत्या थांबवणे अथवा कमी करणे शक्य आहे का? याचे उत्तर "हो" असे आहे.
हे कसे कराल?
१)प्रथम तुमच्या फेसबुक खात्याच्या Privacy Settings मध्ये जा.
२)जे पान उघडेल त्यावरील Connecting on Facebook पर्यांयासमोरील View Settings वर टिचकी द्या.
३)या नंतर दिसणार्या विविध पर्यांयापैकी तुम्हाला कोण मैत्रीची विनंती पाठवू शकत,संदेश पाठवू शकते या मध्ये योग्य ते बदल करा..उदा. everyone ऐवजी तुम्ही friends of friends हा पर्यांय निवडू शकता.जर तुम्हाला तुमचे प्रोफाईल सर्च मध्ये मिळऊ नये असे वाटत असेल तर तुम्ही पर्यांय क्रमांक एक मध्ये Search for you on Facebook समोर only friends हा पर्यांय निवडू शकता असे केल्याने तुमचे खाते फेसबुक सर्च मध्ये अनोळखी लोकाना दिसणार नाही.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment