५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

इंटरनेट वरील वेबपानामधले चित्र कसे हस्तगत(capture) कराल?

मंडळी मागील लेखात "तुमचे ओळखपत्र (ID Card) ऑनलाईन कसे तयार कराल? एका पायरीमध्ये वेबपानामधले चित्र हस्तगत (capture) करण्या विषयी बोललो होतो..आज आपण वेबपानामधले चित्र अथवा संपुर्ण वेबपान कसे हस्तगत(capture) करायचे याची माहिती करून घेवू या.

हे कसे कराल?

१)हे करण्यासाठी प्रथम तुमच्या संगणकावर फायर्फॉक्स ब्राऊजर प्रस्थापित असणे आवश्यक आहे.तो नसेल तर प्रथम तो तुमच्या संगणकावर प्रस्थापित करा. फायर्फॉक्स डाऊनलोड करण्यासाठीचा दुवा खाली दिलेला आहे.

२)आता तुम्हाला वेबपानामधले चित्र अथवा संपुर्ण वेबपान हस्तगत(capture) करण्यासाठी तुमच्या फायरफॉक्स ब्राउजर मध्ये एक Add-on समाविष्ट करणे गरजेचे आहे. त्याचे नाव आहे "Awesome screenshot:Capture and Annotate 2.3.1"

३) ते तुमच्या फायरफॉक्स ब्राउजर मध्ये प्रस्थापित करण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी द्या.


४)जे पान उघडेल,त्यातील Add to Firefox वर टिचकी देवून मग install पर्यांयावर टिचकी द्या आणि ते Add-on तुमच्या फायरफॉक्स ब्राउजर मध्ये प्रस्थापित होवू द्या.

५)एकदा का ते तुमच्या फायरफॉक्स ब्राउजर मध्ये प्रस्थापित झाले की फायरफॉक्स ब्राउजर पुन्हा सुरु केल्यावर वरील बाजुस कोप‍र्‍यामध्ये तुम्हाला चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे एक गोल चिन्ह दिसेल.

६)त्यावर टिचकी दिल्यावर
१) cpature visible part २)cpature full page ३)options असे पर्यांय दिसतील.

*cpature visible part पर्यांय वापरून तुम्ही त्या वेबपानाचा तुमच्या संगणकाच्या पडद्यावर दिसणारा भाग हस्तगत(capture) करू शकता.

*cpature full page पर्यांय वापरून तुम्ही संपुर्ण वेबपान हस्तगत करू शकता.

*options या पर्यांयाचा वापर करून तुम्ही Image Format: PNG अथवा JPG त्याची निवड करू शकता. तसेच Shortcuts Setting मध्ये बदल करू शकता.

७) वेबपानाचा तुमच्या संगणकाच्या पडद्यावर दिसणारा भाग अथवा संपुर्ण वेबपान हस्तगत(capture) करून झाल्यावर चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे एक टूलबार दिसेल त्याचा वापर करून तुम्हाला हवे ते बदल करा..मग Done वर टिचकी द्या.



८)असे केल्यावर एक नविन पान उघडेल त्यातील Save Local पर्यांयाचे निवड करून Save image as a file समोरील Save वर टिचकी द्या.


९)असे केल्याने ते चित्र तुमच्या संगणकावर "Save" होईल.
अश्या अनेक नवनविन गोष्टी जाणून घेण्यासाठी फेसबुक वरचे पान लाईक करायला विसरू नका.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

2 comments: