५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

फेसबुक वर mp3 गाणी कशी अपलोड कराल?


मंडळी माझ्या एका मैत्रिणीला फेसबुक वर गाणी अपलोड करायची होती,तिला ते कसे करावे ते माहित नव्हते.थोडा शोध घेतल्यावर उपाय सापडला


खरेतर तुम्ही फेसबुक वर गाणी अपलोड करू शकत नाही.फेसबुकने ती सेवा दिलेली नाही..फेसबुक Application वापरून तुम्ही ते करू शकता पण ती तिसर्‍या कोणीतरी तयार केलेली असतात आणि त्याचा वापर करताना तुम्हाला त्या फेसबुक Applicationला तुमची खाजगी माहिती वापरायची परवानगी देत असता...मग नेमकी कोणता मार्ग वापरावा जेणे करून तुम्ही तुमची गाणी फेसबुक वर अपलोड करू शकाल?
त्याचीच माहिती आज आपण करून घेणार आहोत.


हे कसे कराल?



१)त्यासाठी प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी द्या.
Cloud




२)जे पान उघडेल त्यावर चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे Sign up पर्यांय दिसेल त्यावर टिचकी द्या.




३)Registration फॉर्म चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे असेल त्यात सर्व माहिती भरा..मग I agree to the Terms of Service ची निवड करून Register वर टिचकी द्या.




४)असे केल्याने तुमच्या खात्याची पडताळणी करण्यासाठी एक इमेल तुमच्या इमेल खात्यावर पाठवला जाईल.




५)तो उघडून त्यातील दुव्यावर टिचकी द्या आणि खात्याची पडताळणी पुर्ण करा.




६)तुमच्या खात्याची पडताळणी पुर्ण झाल्याचे दर्शविणारा संदेश दिसेल.तो खालील चित्राप्रमाणे असेल.




७)आता तुमच्या खात्यामधील Add पर्यांयामधील file पर्यांयावर टिचकी द्या आणि तुमच्या संगणकावरून तुम्हाला हवी ती mp3 गाण्याची फाईल अपलोड करा.




८)फाईल अपलोड झाल्यानंतर Drops वर टिचकी द्या (अपलोड केलेली फाईल खाजगी ठेवायची की सार्वजनिक त्याची निवड तुम्ही करू शकता पब्लिक पर्यांय वापरला तरच ती सर्वांना दिसेल.)




आणि गाण्याच्या आयकॉन वर टिचकी द्या.


असे केल्याने view नावाचा पर्यांय दिसेल त्यावर right-click  करा आणि Copy link location चा वापर करून तो दुवा तुमच्या फेसबुकच्या वॉल वर शेअर करा.




असे केल्याने तुमच्या फेसबुक वॉलवर ते गाणे प्लेयर सकट पोस्ट होईल आणि तुमच्या मित्रपरिवारातील सर्व ते गाणे प्ले पर्यांयाचा वापर करून फेसबुकवर ऎंकू शकतील.




याचे प्रात्यक्षिक पाहायचे असेल तर खाली दिलेला दुवा कॉपी करून तुम्ही तुमच्या फेसबुक वॉलवर शेअर करू शकता.


http://cl.ly/AHXF/Tu_Prashant_D_Redkar.mp3


धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.

गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

  Blogger Comment
  Facebook Comment

4 comments:

 1. ब्लॉग फ़ार सुंदर आहे. माहिती बरीच उपयोगी दिसते. :)

  ReplyDelete
 2. प्रतिक्रिया दिल्याबद्दल मी आपला मनापासुन आभारी आहे :-)

  ReplyDelete
 3. hi prashant dis was very very helpful ..but i m nt able to do it yr way.. all i hv done gvs an option to download.. i dont want dat... i jst want ppl to listen to my music.. nt everybody can dload... so what to do? i followed every instruction of yrs carefully .. bt i m nt getting privacy option nor d view window nd no jst play button whr ppl can listen on my fb wall.. what to do? i was very excited initially about dis..bt now .. disappointed.. whr m i going wrong.. pls help/...God Bless u for all dis help..u keep posting..i was going to gv u a million thanks.. bt nowi will gv dem only after wth yr help wen i can solve dis problem...:)

  ReplyDelete
 4. ते सोप्पे आहे...
  पायरी क्रमांक ८ मध्ये लिहिल्याप्रमाणे गाणे अपलोड केल्यावर आणि पब्लिक पर्यांयाची निवड केल्यावर,Drops वर टिचकी द्या,मग गाण्याच्या आयकॉन वर टिचकी द्या. view नावाचा पर्यांय दिसेल त्यावर right-click करा आणि Copy link location चा वापर करून तो दुवा तुमच्या फेसबुकच्या वॉल वर शेअर करा.

  ReplyDelete