५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

वाचक संख्या १ लाख १४१ :-) धन्यवाद

धन्यवाद मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळे आज माझ्या अनुदिनीच्या वाचकसंखेने १ लाखाचा आकडा पार केला आहे..गेल्या ९ महिन्यात मला ज्या ज्या विषयाची माहिती आहे, आवड आहे,जी माहिती मिळवण्यासाठी,शिकण्यासाठी मला खुप त्रास झाला आहे,तसा त्रास इतरांना होवू नये..या एकाच प्रामाणिक हेतूने मी मराठीमध्ये अनुदिनीचे लिखाण करत आहे.आज तुमच्या प्रेमाची पावती या वाचक संख्येच्या रुपाने मिळाली खरेच तुम्हा सर्व रसिक वाचकांचे मनापासुन आभार.

 तुमची अशीच कृपादृष्टी आणि प्रेम मिळत राहू दे..मी तुम्हाला सतत काहीना काही नविन, जे मला माहित असेल ते, अनुदिनी मार्फत देण्याचा प्रयत्न नक्कीच करीन. :-)

देव तुम्हा सर्वांचे भले करो...तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पुर्ण होवू दे..ही ईश्वरचरणी प्रार्थना.

धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

3 comments:

  1. Congrats Prashant

    ReplyDelete
  2. मनापासून अभिनंदन.. मी पण या वाचका मधील एक आहे. तुम्हाला एवढी सगळी माहिती मिळते कशी याची पण एखादी पोस्ट जरूर टाका. मला जाणून घ्यायचे खूप उत्सुकता आहे कारण ती वापरून वापरून मी थकते पण तुमच्या उपयोगी पोस्ट मात्र अखंडपणे येत असतात. तुमच्या ब्लॉगची वाचक संख्या वाढली नाही तरच नवल.
    पुनश्च खूप खूप अभिनंदन...

    ReplyDelete
  3. विद्या,धन्यवाद,
    मी बरेच वर्ष या क्षेत्रामध्ये आहे...मला माहिती मिळवण्यासाठी बराच त्रास झालेला आहे...तो इतरांना होवू नये म्हणून मी मला जे जे माहित आहे,ती सर्व माहिती माझ्या मराठी मित्रमैत्रिणीं सोबत वाटून घ्यायचा नेहमी प्रयत्न करतो.

    ReplyDelete