५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुमच्या फेसबुक पानावर live streaming कशी कराल?

मंडळी तुम्ही जर कलाकार लेखक अथवा लोकप्रिय व्यक्ती असाल अथवा तुमचा व्यवसाय असेल तर आता पर्यंत तुम्ही तुमचे चाहते अथवा कंपनीशी संबंधित व्यक्तींशी संपर्क वाढावा यासाठी फेसबुकवर चाहत्यांचे पान(फेसबुक फॅन पेज बनवले असेलच)...काय म्हणता अजुन बनवले नाही..नसेल तर ते कसे बनवायचे याची माहिती तुम्हाला खाली दिलेल्या दुव्यावर मिळेल.
http://prashantredkarsobat.blogspot.com/2011/03/blog.html

याचा मुख्य फायदा हा आहे की तुम्ही तुमच्या चाहत्यांशी सहज संपर्क साधू शकता,त्यावेळी त्यांचे प्रश्न तुम्ही वाचू शकता आणि त्यांना live streaming  द्वारे उत्तरे देवू शकता,त्यामुळे काय होईल? तुमच्या चाह्त्यांशी सहज संपर्क साधणे तुम्हाला शक्य होईलच आणि हे सर्व टिव्ही शो सारखे तुम्ही बसल्या जागी करू शकणार आहात.

हे कसे कराल?

 
१)प्रथम तुमचे फेसबुक वरचे चाहत्यांचे पान बनवा.

http://prashantredkarsobat.blogspot.com/2011/03/blog.html

२)नंतर live streaming करता यावी यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर जावून एक खाते बनवा,ज्याचा वापर करून तुम्ही live streaming करणार आहात.

http://www.ustream.tv


३)खाते तयार केल्यानंतर त्या खात्यावर लॉग-इन व्हा मग
Go to Dashboard पर्यांयावर टिचकी द्या.

४)मग तुम्हाला Create a Channel नावाचा पर्यांय दिसेल त्यावर टिचकी द्या.
       

५)मग चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे चॅनेलचे नाव लिहून Create वर टिचकी द्या.
          

६)Channel Info मध्ये सर्व आवश्यक बाबींची पुर्तता करा.
            

७)असे केले की तुमचा चॅनेल तयार झाला.Go To Channel  पर्यांयाचा वापर करून तुम्ही तो पाहू शकाल..

सध्या live streaming बंद असल्याने तो तुम्हाला offline आहे असे दर्शविले जाईल.

८)Go Live! पर्यायाचा वापर करून तुम्ही live streaming  सुरु करू शकता. त्यासाठी Go Live! वर टिचकी द्या.

असे केल्यावर चॅनेलचे नाव आणि broadcast करण्याबाबत विचारणा केली जाईल,ते करण्यासाठी नाव निवडून broadcast वर टिचकी द्या.

असे केल्यावर तुमचा माईक आणि वेबकॅम वापरण्याबाबत विचारणा केली जाईल त्यासाठी allow  वर टिचकी द्या..झाला तुमचा live streaming  चॅनेल सुरु.


९)आता तुम्हाला हा live streaming  चॅनेल फेसबुक फॅन पेज वर दाखवायचा आहे,त्यासाठी काय करावे लागेल याची माहिती आपण पुढे घेणार आहोत.

१०)त्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर जा
https://apps.facebook.com/ustream_live/

आणि Get it now  वर टिचकी द्या.हे करताना तुम्ही फेसबुक खात्यावर लॉग-इन असणे गरजेचे आहे.
 

११)असे केल्यावर पुढच्या पानावर Add Ustream Live अशी विचारणा केली जाईल त्याला परवानगी द्या..चित्र पहा.
             
१२)आता तुम्हाला तुमच्या खात्यावरील दुव्यांमध्ये Ustream Live नावाचा दुवा समाविष्ट झालेला आढळेल.त्यावर टिचकी द्या.


१३)असे केल्यावर तुम्हाला Ustream Live Settings दिसतील त्यात तुमचे खात्याचे Ustream Account:Account name:
Ustream Channel यांची माहिती असेलच
 त्याशिवाय Connect Social Networks पर्यांयातील फेसबुक, पर्यांय सुरु करणे आवश्यक आहे.

           


त्यासाठी फेसबुक पर्यांयावर टिचकी द्या आणि सर्व विचारलेल्या जागी allow करा असे केल्यावर तुम्हाला Ustream Live Settings  मध्ये फेसबुक पर्यांयावर समोर Connected! लिहिलेले दिसेल.

१४)Customize Features & Layout  समोर टिचकी देवून
Chat: मध्ये social stream अथवा फेसबुक चॅट पर्यांय निवडा
Live events and recorded videos viewable by:Everyone अथवा Facebook Fans Only निवडा.मग Save Changes  करा.


१४‍)असे केल्यावर तुम्हाला तुमच्या पानावर खालील चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे live streaming चॅनेल दिसेल..त्याचा वापर करा आणि तुमच्या फॅन्स सोबत एकाच वेळी ऑनलाईन संपर्क करा.


धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment