मंडळी आज आपण गूगल ड्राइव वापरुन ५ जीबीची माहिती साठवण्याची जागा गुगल कडून मोफत कशी मिळवाल? याची माहिती करून घेणार आहोत.गूगल ड्राइवचा वापर करून तुम्ही तुमच्या
सर्व महत्वाच्या फाईल साठवू शकता आणी इतरां सोबत शेअर करू शकता.
हे कसे वापराल?
१)प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर जा.
https://drive.google.com
२) जे पान उघडेल त्यावर तुमचे गुगल खात्याचे युजरनेम आणी परवलीचा शब्द(पासवर्ड)वापरून प्रवेश करा.
३)उघडलेले पान खाली दिसणा-या चित्रा प्रमाणे असेल.
कोप-यावर दिसणा-या go to google drive या पर्यायांचा वापर करा.
४)पुढील पानावर जी विंडो उघडेल त्यातील try google drive या पर्यायावर टिचकी द्या.
५)Create पर्यायांचा वापर करून तुम्हाला जे काही वापरायचे असेल अथवा शेअर करायचे असेल ते तयार करा.
६)download google drive for pc हा पर्याय वापरून तुम्ही ते तुमच्या संगणकावर प्रस्थापित करू शकता.
म्हणजे तुमच्या सर्व फाईल आपोआप तुमच्या संगणकावर सुदधा उतरवल्या जातील.
चित्र पहा
७)संगणकावर गूगल ड्राइव प्रस्थापित केल्यावर परत एकदा तुमचे गुगल खात्याचे युजरनेम आणी परवलीचा शब्द(पासवर्ड)वापरून प्रवेश करा.
आणी खाली दिलेल्या पाय-या पूर्ण करा.
८)start sync या पर्यायावर टीचकी दिल्यावर तुम्ही तुमच्या गुगल ड्राइववर जतन केलेली माहिती आपोआप तुमच्या संगणकावर उतरवली जाईल.
९)अपलोड पर्यायाचा वापर करून तुम्ही तुम्हाला हवा त्या फाईल,फोल्डर या गुगल ड्राइववरच्या जागेमध्ये चढवू शकता आणी हव्या त्या व्यक्ती अथवा मित्रपरिवारासोबत शेअर करू शकता.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment