मंडळी, आता पासून वर्षाला ६ गॅस सिलंडेर मिळणार...मग पुढचे ६ महिने करायचे काय याचा विचार मी करत होतो आणी एक उपाय सापडला तो म्हणजे विजेवर चालणारी "इंडकशन शेगडी".याचा वापर गॅस शेगडी सोबत करून १ गॅस सिलंडेर आपण २ महिने वापरू शकतो.सौर उर्जेवर चालणारे सौर कुकर हे आपल्या शहरी भागातल्या लोकांसाठी उपयोगी नाहीत कारण पुरसा सूर्यप्रकाश आजकाल मिळतो तरी कुठे?
ही इंडकशन शेगडी वापरायला खुपच सोप्पी असते.त्याची किमत पण खूप कमी आही...२१२० रुपयापासुन ते ५००० पर्यंत वेगवेगळ्या कंपनीची इंडकशन शेगडी मिळू शकते. १ महिना पुरेल इतक्याच गॅस सिलेंडर सोबत आपण त्याचा वापर केला तर सहज २ महिन्या पर्यंत आपण गॅस सिलेंडर पुरवून वापरू शकतो. :-) आणी भारनियमन असेल तेव्हा गॅस सिलंडेरचा वापर करून इतर वेळी इंडकशन शेगडीचा वापर आपण करू शकतो.म्हणजे गॅस सिलेंडरची मर्यादा संपल्यावर ७००-८०० रुपये दरम्यान किमत असलेले महागडे गॅस सिलेंडर घ्यावे लागणार नाहीत.
या शेगडीवर पदार्थ लवकर होतात.
आपण वेळ आणी तापमान नियंत्रित करू शकतो.
विजेचा वापर जास्त होत नाही..येणारे बिल नक्कीच महागड्या गॅस सिलंडेर पेक्षा कमी.
दिलेली वेळ झाल्यावर आपोआप बंद होतात.
वापरायला खुपच सोप्पे आणी कुठेही आपण सोबत घेवून जावू शकतो.
त्यामुळे इंडकशन शेगडीचा वापर जास्त सोईचा आहे.
बाजारामध्ये बजाज,फिलिप्स,प्रेस्टीजचे इंडकशन शेगडीचे पर्याय उपलब्ध आहेत.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

0 comments:
Post a Comment