- रेडीचा स्वयंभू गणपती
- माझ्या गावचे आणखी एक विशिष्ट म्हणजे स्वयंभू गणपतीची मूर्ती.
- ही गणेश मूर्ती द्विभुज आहे.
- खाणीच्या परिसरामध्ये १८ एप्रिल १९७६ रोजी ही मूर्ती प्रकटली.
- या मागे एक कथा आहे.ती अशी:
१८ एप्रिल १९७६ रोजी त्यांनी एका विशिष्ठ ठिकाणी ट्रक उभा केला आणी ते तिथेच झोपले असता पहाटेच्या सुमारास श्री गणेशाने त्याना स्वप्नामध्ये येवून माझे या ठिकाणी वास्तव्य आहे,या ठिकाणी खोदा असा दृष्टांत दिला.
त्या नुसार खोदकाम केले असता या ठिकाणी श्री गणेशाची द्विभुज मूर्ती सापडली.
मग या ठिकाणी गणेश मंदिर उभारण्यात आले.
- सध्या तिथे मंदिर नुतानिकरणाचे काम सुरु आहे.
- यावेळी श्री गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मी गावी जातोच आहे.मग नवीन मंदिराची छायाचित्रे इथे समाविष्ट करीन .
0 comments:
Post a Comment