मंडळी ,
आज आपण फेसबुक मॅसेंजर तुमच्या संगणकावर कसा प्रस्थापित करावा याची माहिती करून घेणार आहोत.
जेणेकरून याहू मॅसेंजर प्रमाणे तुम्ही तो तुमच्या संगणकावर प्रस्थापित करून वापरू शकता.
हे कसे कराल?
१)यासाठी प्रथम तुमच्या फेसबुक खात्यावर प्रवेश करा.
https://www.facebook.com
२)मग खाली दिलेल्या दुव्यावर जा.
https://www.facebook.com/about/messenger
३)जे पान उघडेल ते चित्रामध्ये दाखाविल्या प्रमाणे दिसेल.
४)त्यातील Install Now या पर्यायावर टिचकी दया.
५) असे केल्याने फेसबुक मॅसेंजरची सेटअप फाईल तुमच्या संगणकावर उतरवली जाईल.
६)डाऊनालोड पूर्ण झाल्यावर त्या फाईलवर टिचकी देवून ती तुमच्या संगणकावर प्रस्थापित करा.
७)असे केल्यावर तुम्ही तुमच्या संगणकावरून फेसबुक मॅसेंजर वापरून गप्पा करू शकाल.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment