५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

घरातल्या संगणकावर whatsapp कसे प्रस्थापित(install) करावे?


घरातल्या संगणकावर whatsapp कसे प्रस्थापित(install) करावे?याची माहिती
आपण आज करून घेणार आहोत.
माझे वाचक सचिन यांनी मला या विषयावर लिहायची विनंती केली होती,
त्या नुसार या बद्दल लिहित आहे.हे कसे कराल?


whatsapp हे सध्या वापरात असलेले लोकप्रिय app आहे.
ते जसे मोबाईल मध्ये वापरता येते तसेच संगणकावरून सुद्धा वापरता येते.

१)हे करण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर जा

http://www.bluestacks.com/

२)तिथे Download XP, VISTA, WIN7/8 नावाचा पर्याय दिसेल
त्यावर टिचकी द्या आणि सेटअपची फाईल डाउनलोड करून घ्या.

३)संपूर्ण फाईल डाउनलोड झाल्यावर फाईल रन करून ती तुमच्या संगणकावर प्रस्थापित करा.

४)आता start Bluestacks आयकॉन वर टिचकी दया असे केल्यावर तो प्रोग्राम तुमच्या
संगणकाच्या पडद्यावर चित्रात दाखविल्याप्रमाणे उघडताना दिसेल.


५)सुरुवातीला तुम्हाला तुमचे जीमेल खाते गुगल प्ले स्टोर सोबत जोडण्यास विचारले जाईल
ते करून घ्या.

६)सर्च पर्यायाचा वापर करून हवे ते app शोधा उदा.whatsapp आणि ते इंस्टाल करा.७)आता तुम्ही तुमच्या संगणकावरून whatsapp वापरू शकाल.

८)whatsapp चे वेरीफिकेशन करताना अडचण येत असेल तर तुमच्या जुन्या साध्या मोबाईल(ज्यात अन्द्रोइद नाही) मध्ये

सीम कार्ड टाका आणि वेरीफिकेशन साठी तो मोबाईल नंबर द्या असे केल्याने तुमच्या त्या  मोबाईल वर whatsapp

कडून वेरीफिकेशन कोड येईल.तो कोड तुम्ही Bluestacks मध्ये इंस्टाल असलेल्या whatsapp मध्ये वेरीफिकेशन साठी वापरा
९)असे केल्याने तुम्ही तुमच्या संगणकावरून whatsapp वापरू शकता.
इतकेच नाही तर कोणतेही इतर app इंस्टाल करून वापरू शकता.
धन्यवाद!
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर  

(लिखाण कॉपी पेस्ट केल्यावर आम्हाला माहीतच नव्हते असे म्हणणा-यांसाठी,मराठी मध्ये लिहायला भरपूर वेळ लागतो,जर तुम्हाला लेख आवडला तर कृपया कॉपी पेस्ट करण्यापेक्षा तुमच्या वेबसाईट वर लेखाची लिंक द्या.ते अधिक चांगले असेल.)
 
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

  Blogger Comment
  Facebook Comment

5 comments:

 1. धन्यवाद प्रशांत दा लगेच करून बघतो

  ReplyDelete
 2. मी ब्लू स्टॅक मधून व्हाट्स एप वापरण्याचा प्रयत्न केला पण सिस्टम रिक्वायरमेंट्समुळे अडचण आली त्यामुळे मी युवेव मधून इन्स्टाल केले..
  ज्यांना ब्लू स्टॅकमधून अडचण येत असेल ते युवेव मधून व्हाट्स एप वापरू शकतात.. अधिक माहिती इथे मिळेल

  ReplyDelete
 3. Thanks for your post but how to install whatsapp on xindows XP service pack2 because bluestack requires service pack 3

  ReplyDelete
 4. Whatsapp वापरता येते पण इतर मोबाईल वरील अँड्रॉइड offline app कसे इंस्टॉल करायचे ते सवीस्तर सांगा मी windows 7 वापरतो

  ReplyDelete
 5. Whatsapp वापरता येते पण इतर मोबाईल वरील अँड्रॉइड offline app कसे इंस्टॉल करायचे ते सवीस्तर सांगा मी windows 7 वापरतो

  ReplyDelete