समजा तुम्ही तांत्रिक विषयावर ब्लॉग लिहित आहात,ज्यात पोस्टमध्ये तुम्हाला स्क्रिप्ट आणि कोड समाविष्ट करणे गरजेचे आहे.अश्या वेळी ते करणे सोप्पे जावे यासाठी खाली दिलेली कृती करा.
१)प्रथम खाली दिलेली लिंक उघडा
http://pastebin.com/
२)तुम्हाला जो कोड अथवा स्क्रिप्ट ब्लॉग पोस्ट मध्ये समाविष्ट करायची आहे ती खाली दिल्याप्रमाणे रिकाम्या जागी पेस्ट करा.
३)असे करून झाल्यावर submit पर्यायावर टिचकी द्या..आता तुम्ही दिलेली माहिती स्पॅम तर नाही ना हे पाहण्यासाठी तुम्हाला एक कोड इंटर करण्यास सांगण्यात येईल.
४)तो कोड जसाच्या तसा टाईप करून परत एकदा submit वर टिचकी द्या.
५)आता जे पान उघडेल त्यावर embed नावाचा पर्याय दिसेल त्यावर टिचकी द्या.
६)आता जी स्क्रिप्ट दिसले ती कॉपी करून घ्या
७)आता तुमच्या ब्लॉगर ब्लॉग मध्ये न्यू पोस्ट पर्याय्र निवडून html कोड पर्याय निवडा आणि कॉपी केलेला कोड पोस्ट मध्ये पेस्ट करा..
८)पोस्ट पब्लिश केल्यावर त्यात कोड तुम्हाला खालील प्रमाणे दिसेल.
नमस्कार,
मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.
1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.
**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.
**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.
कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट
४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे
savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra
धन्यवाद :-)
0 comments:
Post a Comment