तुमच्या ब्लॉग अथवा वेबसाईटवर फेसबुक सारखे chat कसे समाविष्ट करावे? याची माहिती आज आपण करून घेणार आहोत..काही वर्षापूवी या बाबतची पोस्ट मी लिहिली होती,पण जुनी सेवा देणारी कंपनी बंद झाल्याने या नवीन पद्धती बद्दल मी लिहित आहे.
कृती:
१)प्रथम खाली दिलेल्या वेबसाईट वर जा
http://chatcat.io/home/
२)मग फ्री वर्जन साठी नावनोंदणी करा.
३)नाव नोंदणी मध्ये जो इमेल आयडी वापरलेला असेल त्यावरपडताळणी करण्यासाठी एक मेल येईल तो उघडा आणि त्यातील लिंक वर टिचकी देवून तुमचे खाते कार्यान्वित करा.
४)आता जे पान उघडेल त्यात login पर्याय वापरून त्या साईट वरील खात्यामध्ये प्रवेश करा.
५)या नंतर add domain पर्यायावर टिचकी देवून तुमचा ब्लॉग अथवा वेबसाईटचा पत्ता समाविष्ट करा.
६)या नंतर तुमच्या ब्लॉगच्या Template मध्ये edit html पर्याय वापरून </body> च्या आधी खाली दिलेला कोड समाविष्ट करा.(हे कसे करतात ते माहित नसेल तर जाणकार व्यक्तीची मदत घ्या)
असे केल्यावर तुमच्या ब्लॉग वर फेसबुक सारखा chat पर्याय दिसू लागेल...माझ्या ब्लॉग वर तळाला कोप-यात असलेला पर्याय पहा.
0 comments:
Post a Comment