५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुमच्या चाहत्यासोबत केलेल्या दृक्श्राव्य गप्पागोष्टीचे(audio video chat) लाइव्ह प्रक्षेपण कसे करावे?


मित्रमंडळी,
तुम्ही कलाकार असाल,गायक/गायिका  असाल अथवा एखाद्या विषयातले जाणकार असाल,तर तुमचा मोठा चाहता वर्ग असतो,त्याना सतत तुमच्याविषयी जाणून घ्यायचे असते,तुमच्या सोबत गप्पा मारायच्या असतात,दरवेळी त्यासाठी  स्टुडीओमध्ये जावून रेकोर्डिंग करणे शक्य असतेच असे नाही...मग अगदी साधी सोप्पी पद्धत वापरून अगदी मोफत घरच्या घरून अथवा विशिष्ट ठिकाणावरून तुम्हाला तुमच्या चाहत्यांशीसोबत  केलेल्या दृक्श्राव्य गप्पागोष्टीचे लाईव्ह प्रक्षेपण कश्या प्रकारे करता येतील याची आज आपण माहिती करून घेणार आहोत.या आधीही एकदा मी या विषयी लिहिले होते..आज सविस्तर चित्रांसकट माहिती देत आहे.

साहित्य:
1)कमीत कमी 512 kbps अथवा  त्याहून अधिक क्षमतेचे इंटरनेट कनेक्शन...१ mbps अथवा २ mbps स्पीड असलेले असेल  तर उत्तमच.

२)कमीत कमी उत्तम दर्जाचा वेबकॅमेरा अथवा handy-cam(याची जोडणी संगणकाशी कशी करावी याची माहिती आजकाल सर्वाना असतेच..ते माहित नसेल तर बेसिक सेटअपसाठी संगणकाची थोडी बहुत माहिती असलेल्या कोणाचीही मदत घेता येईल.)

३) हेडफोन विथ माईक अथवा चांगल्या दर्जाचा माईक 

 कृती:
1)वरील सुविधांनी युक्त असलेला संगणक निवडा.

२)यानंतर दृक्श्राव्य गप्पागोष्टी(audio video chat) करण्यासाठी प्रथम तुम्हाला खाली दिलेल्या वेबसाईटवर जावून नाव नोंदणी करावी लागेल.त्या साठी वेबब्राउजर मध्ये खाली दिलेली वेबलिंक उघडा.

http://www.ustream.tv/

या वेबलिंकवर signup नावाचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

३) आता जे पान उघडेल त्यावर चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे Log in  आणि TRY IT FREE असे दोन पर्याय दिसतील.यातील  TRY IT FREE हा त्यांच्या प्रो वर्जानची जाहिरात आहे..त्यामुळे त्यावर क्लिक करू नका..आपल्याला नाव नोंदणी करण्यासाठी Log in  पर्यायावर क्लिक करणे गरजेचे आहे.


४) Log in पर्यायावर क्लिक केल्यावर चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे
Log in or sign up for Ustream With Facebook   पर्याय वापरून प्रथम नावनोंदणी करा.

५)आता चित्रात दाखविल्याप्रमाणे Log in or sign up for Ustream With Facebook पर्यायावर क्लिक करा.असे केल्यावर फेसबुकची login विंडो उघडेल त्यात तुमचे फेसबुक युजरनेम आणि पासवर्ड इंटर करून लॉग इन वर क्लिक करा.



६)असे केल्यावर टर्म ऑफ सर्विस आणि प्रायवेसी पोलिसी दाखवणारे पेज उघडेल त्यातील I agree समोरील चेक बॉक्स चेक करा आणि सबमिट वर क्लिक करा..असे केल्याने तुमच्या खात्याची पडताळणी आणि नोंदणी पूर्ण होईल.(चित्र पहा)


७)पहिल्या वेळी try it free अथवा Go Live पर्यायावर क्लिक करावी लागेल असे केल्यावर Pro Broadcasting  or  Basic अशी विचारणा केली जाईल...तेव्हा Don't show this offer to me again पर्यायासमोर क्लिक करा आणि remain Basic पर्याय निवडून पुढे जा.


८) आता जे पान उघडेल त्यावर चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे तुमच्या channel बद्दल प्राथमिक माहिती  भरावी लागेल ती भरा.


९)यानंतर जी  स्क्रीन उघडेल ती अश्या प्रकारे दिसेल.
त्यातील ही सुचना दाखवणारी विंडो चेकबॉकस चेक करून नंतर  क्लोज वर क्लिक बंद करा.
१०)flash प्लेअरला कॅमेरा आणि मायक्रोफोन access द्या त्यासाठी Allow वर क्लिक करा.(चित्र पहा)
 ११)आता तुमचा   audio video chat करण्यासाठी सेटअप पूर्ण झालेला आहे.



१२)Start Broadcast बटन वर क्लिक केल्यावर तुमचे Live Broadcasting सुरु होईल. Start Record बटन वापरून तुम्ही ते रेकोर्ड सुद्धा करू शकता.(नुसता आवाज की व्हीडोओ सकट प्रक्षेपण करायचे ते तुमच्यावर अवलंबून आहे. )प्रक्षेपण करताना घायची महत्वाची काळजी म्हणजे प्रक्षेपण सुरु असताना एकदा का Start Broadcast बटन वर क्लिक  केली तुमचा ब्राउजर मिनिमाइज करून ठेवा..स्वत:चे प्रक्षेपण स्वत: त्या ब्राउजर मध्ये पाहू नका. कारण असे केल्याने तुमच्या आवाजाचा प्रतीध्वनी त्यात मिसळेल आणि समोरच्याला दोन वेळा तो संवाद ऐकू येईल.

१३)Share Your Broadcast with Your Followers पर्याय वापरून तुम्हाला तुमच्या चाहत्यांना फेसबुक,ट्वीटर वर या लाईव्ह audio video chat ची लिंक देता येईल.
ती खालील प्रमाणे असेल

उदा..माझ्या दृक्श्राव्य गप्पागोष्टी(audio video chat) ची लिंक खालील प्रमाणे आहे आणि ती चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे दिसेल
http://ustre.am/1nYF9



१४)लाईव्ह प्रक्षेपण बंद करण्यासाठी stop Broadcast पर्यायावर क्लिक करावी लागेल.

१५)तुमचे प्रक्षेपण सुरु असताना social Stream पर्याय वापरून तुमचे फेसबुक twitterवरचे चाहते कॉमेंट करू शकतात अथवा तुमच्याशी संवाद साधू शकतात.

१६)त्याच प्रमाणे तुम्ही तुमच्या अकाउंट सेटिंगमध्ये जावून तुमचे twitter आणि youtube अकाऊट सुद्धा जोडू शकता, असे केल्याने तुमचे लाईव्ह प्रक्षेपण आपोआप तुमच्या युट्युब  चॅनेल वर अपलोड होईल.
(चित्र पहा.)



 १७) मित्रमंडळी हे करताना, पहिल्या ३-४ वेळा तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी सोबत याची चाचणी घ्या..म्हणजे नेमके काय करायचे आणि कसे होते हे तुमच्या लक्षात येईल आणि  या चाचण्या यशस्वी झाल्यावर,काय बोलायचे,कसे बोलायचे हे निश्चित करून, एखादा दिवस आणि वेळ ठरवून तुमच्या चाहत्यांशी संवाद साधा.
अश्या पद्धतीने तुम्ही तुमची लाईव्ह मुलाखत सुद्धा प्रक्षेपित करू शकाल. :-)

शक्य तितक्या सोप्प्या समजेल अश्या भाषेमध्ये,सर्व पाय-या दाखवून मी हा लेख लिहिला आहे..तरीही अडचण येत असेल तर संगणकाची थोडी बहुत माहिती असलेल्या व्यक्तीची मदत घ्या.
काही मदत लागली तर मी आहेच. :-)

धन्यवाद!


गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

1 comments: