५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

ग्राफिक्स आणि अनिमेशनयुक्त चलचित्र(video) मोफत बनवून फेसबुक,युट्युबवर अपलोड कसे कराल?

 ग्राफिक्स आणि अनिमेशनयुक्त चलचित्र(video) मोफत बनवून फेसबुक,युट्युबवर अपलोड कसे करावे याची माहिती आज आपण करून घेणार आहोत..यासाठी तुम्हाला व्हिडिओ एडिटिंगची माहिती असणे गरजेचे नाही..फक्त तुमचे फोटो आणि व्हीडीओ क्लिप वापरून,सर्व तयार गोष्टी वापरून तुम्ही सहजरित्या, ग्राफिक्स आणि अनिमेशनयुक्त चलचित्र(video)बनवून फेसबुक,युट्युबवर अपलोड करू शकाल.

हे कसे कराल?

१) हे करण्यासाठी प्रथमवेब ब्राउजरमध्ये खाली दिलेली वेबसाईट उघडा

https://studio.stupeflix.com/en/

२)यानंतर Make a free video या पर्यायावर टिचकी द्या.

३)पुढील पानावर Select a theme for your video पर्याय आणि बरेच थीम्स दिसतील.



४) त्यातील एक थीम निवडा आणि  Make a video पर्यायावर टिचकी द्या.

 ५)आता प्लस साईन वर टिचकी द्या आणि चित्रात दाखविल्याप्रमाणे पर्याय निवडा
६)योग्य तो पर्याय निवडून फोटो अपलोड करा.




उदा.

७)पार्श्वसंगीत हवे असल्यास ते सुद्धा समाविष्ट करा.

८) योग्य ते बदल करून झाल्यावर Quick Preview पर्याय वापरून केलेले बदल योग्य आहेत का ते पहा,यानंतर Produce & Save पर्यायावर टिचकी द्या.


९)असे केल्यावर ३ पर्याय दिसतील त्यातील Public 360 हा मोफत पर्याय निवडून Make free video पर्यायावर टिचकी द्या.


१०)असे केल्यावर तुमचा व्हिडिओ अपलोड होईल.

११)मग जे पान उघडेल ते  खालील  प्रमाणे दिसेल.

https://studio.stupeflix.com/v/gujXSPCJo3Nd/

१२)शेअर पर्याय वापरून तुम्ही ते चलचित्र फेसबुक  अथवा twitter वर शेअर करू शकता..अथवा इमेल पर्याय वापरून ती लिंक मित्रपरिवाराला पाठवू शकता.इम्बेड पर्याय वापरून तुम्ही हे चलचित्र तुमच्या ब्लॉग पोस्टमध्ये सुद्धा समाविष्ट करू शकता.
१३)हे चलचित्र फेसबुक आणि युट्युब वर अपलोड करण्यासाठी चित्रात दाखवलेले पर्याय वापरा..हे पर्याय तुम्हाला फक्त पहिल्यावेळी उपलब्ध होतील.
१४)फेसबुक वर अपलोड करण्यासाठी Connect to Facebook पर्यायावर टिचकी द्या..हे करण्यासाठी तुम्ही फेसबुक वर Log in असणे गरजेचे आहे..तसे नसेल तर तुम्हाला Log in करावे लागेल.

१५)यानंतर फेसबुक appला परवानगी द्या (चित्र पहा)


आणि ओके वर टिचकी द्या.
१६)असे केल्याने तो व्हिडिओ आपोआप तुमच्या फेसबुक खात्यावर अपलोड होईल 

आणि खालील प्रमाणे दिसेल.नेहमीच्या वापरासाठी तुम्ही या साईट वर एक खाते सुद्धा तयार करून ठेवू शकता.



Test Video
Posted by Prashant Redkar on 10 May 2015
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment