५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

दुस-या भाषेतली पीडीएफ,डॉक्युमेंट फाईल भाषांतर करून कशी वाचाल?

          
मित्रमंडळी,
दुस-या भाषेतली पीडीएफ फाईल भाषांतर करून कशी वाचाल?याची माहिती आज आपण करून घेणार आहोत.समजा एखादी पीडीएफ फाईल सॅनिश  अथवा दुस-या भाषेत दिलेली आहे जी तुम्हाला येत नाही,पण त्या फाईल मध्ये लिहेलेले वाचणे तुमच्यासाठी फार महत्वाचे आहे.मग आता ते शक्य होईल का?
हो ते सहज शक्य होईल आणि ते सुद्धा गुगलच्या मदतीने

हे करण्यासाठी
प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर जा
http://www.onlinedoctranslator.com/

जे पान उघडेल ते स्कॉल करून तळाला असलेल्या Translate Now पर्यायावर टिचकी द्या.

तुम्हाला ज्या फाईलचे भाषांतर वाचायचे आहे ती अपलोड करा.

 पीडीफ फाईल अपलोड करताना असा वोर्निग मेसेज स्कीन वर दिसेल तो ओके करा

यानंतर भाषेशी निवड करा ज्या भाषेत ती फाईल आहे आणि ज्या भाषेमध्ये तुम्हाला भाषांतर करायचे आहे
ती भाषा निवडून Translate पर्यायावर टिचकी द्या


भाषांतर पूर्ण झाल्यावर खालील प्रमाणे संदेश तुमच्या स्क्रीन वर दिसेल 
 यानंतर खालील प्रमाणे दिसणा-या मजकुरावर टिचकी द्या आणि ती भाषांतरीत  फाईल तुमच्या संगणकावर डाउनलोड करून घ्या.
धन्यवाद!
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर



गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment