माझ्या मना तुच सांग ना??
नमस्कार मंडळी,
काही वर्षा आधी मानवी मनाने आणि त्याचा सामर्थ्याने मला भुरळ घातली होती,त्या वेळी
म्हणजे १९९९ च्या आसपासच्या काळात मी हा लेख लिहिला होता..आज या ब्लोग च्या माध्यमातून
मी तो तुमच्या समोर सादर करत आहे.
माझ्या मना तुच सांग ना??
*******************
©प्रशांत दा.रेडकर.
फार प्राचीन काळापासुन मनाची संकल्पना व कार्यपद्धती शोधण्याचा दृष्टीने प्रयत्न झाले आहेत.त्या सर्व प्रयत्नांमध्ये भारतीयांमार्फत केलेले प्रयत्न फार महत्त्वाचे होते(इथे माझ्या बोलण्यावर किंवा विचारांवर विरोधी भुमिका घेतली जाऊ शकते किंवा कित्येकाना ते विचार पटणार ही नाहीत.) पण जगाची जडणघडण व मानवी आयुष्यातील गुढ तथ्य शोधायची असतील तर याची उकल होणे गरजेचे आहे.
मी मान्य करतो या अफाट मानवरुपी सागरात असंख्य विद्वान व आपल्या सारखे ज्ञानी लोक असतील.मी मांडलेले कित्येक विचार मुर्खतापूर्ण ,कल्पनाशक्तीचा अफलातून आविष्कार वाटू शकतील.पण मी इथे स्पष्ट करु इच्छितो की आज जरी हे विचार मुर्खतापूर्ण वाटले तरी येणाऱ्या काळात हा गुंता सोडवण्यात,या विचारांची सिद्धांतांची प्रमाणे मिळवण्यात आपल्या सारख्या बुद्धीमंताना यश मिळू शकेल.त्यामुळे आताच या विषयावर वादळ उठवून कुणाचाच फायदा होणार नाही.
एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मानव जातीचे कल्याण करणारा कुठलाही घटक किंवा शोध विज्ञानामध्ये सामावला गेला पाहिजे. विज्ञाना मध्ये प्रत्येक गोष्टीच्या मागे काही तरी कारण लपलेले असते.या शतकाच्या अखेरी पर्यन्त मानवाने असे कित्येक शोध लावले,जे पुर्वी ऐंकायला हास्यास्पद व अफलातून वाटले असते.पण ते शक्य झाले मानवी मनाच्या जाणीवेतून व कल्पनेतून.हे शोध ज्याला आपण डिस्कवरी म्हणतो ते पुर्वी पासुन या निसर्गात अस्तित्त्वात होते फक्त त्याचे अदृश्य रूप आपल्या समोर प्रकट करायचे होते,जाणवायचे होते आणि ते योग्य वेळी प्रकट झाले,त्याच्या मागे मानवी मनाचे सामर्थ्य एकवटले आहे.या सामर्थ्याच्या जोरावर फार मोठी कामे तडीस नेता येतील.यापासुन मात्र मानव अजुनही अनभिज्ञ आहे व हिच खरी शोकांतिका आहे.
कित्येक गोष्टी अशा असतात की त्यांची प्रमाणे किंवा त्या मागील निश्चित कारण मिळतेच असे नाही.पण जर ती गोष्ट प्रत्यक्ष प्रायोगिकपणे स्विकारली तर त्याचे परिणाम निश्चितच योग्य असतात व ते दिसुनसुद्धा येतात.ज्याप्रमाणे खाल्लेले अन्न पचते कसे ?हे पुर्वी माहीत नव्हते पण आज त्याचा शोध लागलेला आहे.पुर्वी माणुस त्याचा विचार करत नसे कारण त्याला त्याची जाणिव नव्हती,पण परिणाम मात्र योग्य मिळत होते.याच प्रमाणे मानवी मनाचे निश्चित स्थान आहे,योग्य सामर्थ आहे,पण ते योग्य प्रमाणात शोधले गेलेले नाही.तरिही मिळणारा परिणाम दिसुन येतोच.
आज पर्यन्त मनाच्या बाबतीत जे संशोधन झाले आहे,ज्या विद्वानांनी यावर खास प्रयत्न केले आहेत,त्यांचे जग ऋणी राहिलच...परंतू तरीही हे संशोधन अजुन पुर्ण झालेले नाही असे खेदानेच म्हणावे लागेल;कारण मनाच्या खोल सागरापैकी काही थेंबच हाती लागले आहेत.आज माणुस पृथ्वीच्या बाहेर ब्रम्हांडात कांतीकारक शोध लावून प्रगतीच्या पथावर मार्गक्रमण करीत आहे,तरीही स्व:ताच्या मना विषयी तो पुर्णता ज्ञानी नाही,कुठे तरी, काहीतरी महत्वाच राहिलयं व त्या मुळे पुढचा प्रवास कितीही केला तरी कधी ना कधी वळुन पुन्हा महत्वाच्या सामानाच्या शोधात परत फिरावे लागेल,कारण पुढे गेल्या वर कुठल्या तरी वळणा वर असे आढळेल की आपल्या सामर्थ्याचा खरा पूंज,ज्ञानाचा भांडार आणि मौल्यवान वस्तुचा ठेवा आपण मागेच विसरून आलो आहोत...ती वस्तु म्हणजे आपले मनं व त्याचे सामर्थ्य असेल,हे प्रत्येकाने लक्षात घ्या.आज जर या कडे दुर्लक्ष केलेत,तर पुढे फार मोठया उणिवेला तोंड द्यावे लागेल. उदा. पुरेशी तयारी व अन्नाचा साठा न करता जर तुम्ही पृथ्वीच्या दक्षिण धृवाच्या प्रवासाला निघालात तर फार मोठया संकटाला तोंड द्याव लागेल किंवा बोटीला पडलेल्या लहानश्या छिद्राकडे दुर्लक्ष कराल तर ती बोट बुडविण्यास तुम्हीच कारण ठराल.
म्हणुनच मानवी मनाचं सामर्थ जाणुन घेणे व ते वापरलेल्या तथ्यांचा प्रायोगिक वापर करणे योग्य ठरेल.त्या जोरा वर सद्ध्या जे शोध मानवाने लावले आहेत(कुठल्याही वैज्ञानीक शाखेतले शोध असोत)त्या पेक्षा ही असंख्य आश्चर्यकारक शोध लागु शकतात,ज्ञानभंडार खुले होऊ शकते.काळाच्या ओघात आपण कुलपांची चावी हरवून बसलो आहोत,ती शोधायची वेळ येऊन ठेपली आहे.आता पासुन प्रयत्न केले तरच तिजोरीतील ज्ञानभांडार आपण मिळवू शकू,नाहीतर वेळ निघुन गेलेली असेल आणि मग फक्त म्हणण्याची पाळी येईल.."माझी बस चुकली."
©प्रशांत दा. रेडकर
*******************************************************
ता.क.:
********
लेखा मध्ये नमुद केलेली मते माझी वैयक्तिक आहेत...व्यक्ती व्यक्ती प्रमाणे मतांतर असु शकते.
*******************************************************
माझ्या मना तुच सांग ना
ReplyDeleteकधी सांग होईल....
कधी सांग होईल....
तुजला पहाणे?
कसे सांग शोधावे.....
तुजला मनाने ?
:)
ReplyDelete