५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

अशी असावी माझी प्रिया .......अशी असावी माझी प्रिया
******************
©प्रशांत दा. रेडकर


प्रत्येकाला ह्या प्रश्नाच उत्तर कधी ना कधी शोधावच लागत,ते स्वरुप डोळ्यासमोर साकारावच लागत.कारणा काही म्हटलं तरी हा आयुष्यभराचा प्रश्न असतो.पुर्ण आयुष्य आपणास या व्यक्तिच्या सहवासात काढायचं असत.आपल्या सुखदु:खात तिला सहभागी करुन घ्यायच असत.त्या व्यक्तीच्या दु:खात दु:खी व्याय्च असत.परस्परांना प्रेमाची ऊब व आपुलकीचा ओलावा द्यायचा असतो.या जीवनरूपी सागरात पैलतीरावर तरून जायचं असेल तर कुणाची तरी मोलाची साथ लागतेच. तस नसेल तर हा आयुष्यरूपी प्रवास कंटाळवाणा होवून जाईल.एकमेकांच्या राजीखुषीने,साथसोबतीनेच हा प्रवास करावा लागेल.तरच आयुष्याला अर्थ येईल,जीवनाला लय येईल. व सर्व काही सुखद ,सुंदर होऊन जाईल.

आता तुम्ही म्हणाल हा अचानक स्वप्नाळू का झाला..एकदम फ़िल्मी बोलतो आहे....बरोबर ओळखलेत :) ....मी सद्ध्या याच प्रश्नाचे उत्तर शोधतो आहे कि माझी भावी जोडीदार म्हणजे माझी होणारी बायको कशी असावी?

अशी असावी माझी प्रिया:
******************

माझी भावी बायको सुशील आणि समजुतदार असावी..(काय म्हणता सगळे गूण मिळणे कठीण आहे.......असो पण शोधल्याने देव पण सापडतो ना..मग अशी मुलगी नक्की मिळेल हो मला..तुमचे आशिर्वाद असु द्या मंडळी)
पतीच्या मनाला जपणारी,भावनांची कदर करणारी,त्याने सुचविलेले सल्ले व सुचना चांगल्या असल्यास मानणारी व त्यात काही चुक असल्यास "समजुतदारपणे" पटवून देणारी असावी.

सासु मध्ये तिने आपल्या आईचा शोध घ्यावा(तसा प्रयत्न करायला काय हरकत आहे :D).घराला खऱ्या अर्थाने सुखाचं नंदनवन बनवण्याची क्षमता असणारी गृहलक्षी असावी.हसतमुख,प्रेमळ,खरी मैत्रिण असल्या प्रमाणे जिव्हाळ्याची असावी.एक गोष्ट महत्वाची ती म्हणजे तिने कोणतीही गोष्ट लपवून ठेवता कामा नये.मी पण "तिच्या पासुन तरी" कोणतीही गोष्ट लपवून ठेवू इच्छित नाही..कारण अश्या लपवाछपवीतून उगाचच तेढ निर्माण होतात.मग परस्परावर विश्वास राहत नाही.पती-पत्नीचे नाते हे एकमेकावरच्या विश्वासावरच अवलंबुन असत..एकमेकांचे गूणदोष जाणूनच त्यानी एकमेकाला स्विकारलेलं असतं.


(बापरे किती अपेक्षा).....ह्म्म्म्म्म्म...पण नाईलाज को नो ईलाज..शादि का लड्डू जो खाये वो पछताये..जो ना खाये वो भी पछताये...रिस्क तर घ्यावीच लागेल ना :D

चला तर मंडळी आज इतकेच....मी निघालो आता...कुठे म्हणून काय विचारता.....8-)....दिवाना मै चला उसे धुंढने बडे प्यार से ..... :) :)
©प्रशांत दा. रेडकर
*******************************************************
ता.क.:
********
लेखा मध्ये नमुद केलेली मते माझी वैयक्तिक आहेत...व्यक्ती व्यक्ती प्रमाणे मतांतर असु शकते.

*******************************************************
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

  Blogger Comment
  Facebook Comment

11 comments:

 1. chan....mast lihilay ha pan lekh
  tula havi tashi priya tula milu det...
  al d best

  ReplyDelete
 2. मिळेल तुला हवी तशी नक्किच....

  ReplyDelete
 3. धन्यवाद
  देवराई..हो नक्किच... :) :)

  ReplyDelete
 4. http://www.orkut.co.in/AlbumZoom.aspx?uid=2980686154823993425&pid=1222337535515&aid=1222311718#pid=1222337535515


  असलं कसलं हे प्रेम ...
  तुझ्यावाचून मला करमत नाही..
  अन माझ्यावाचून मन तुझ रमतच नाही..
  किती हा आपल्यात अंतराचा दुरावा
  पण ऐकमेका लागलेली ओढ काही कमी होत नाही..
  आता तुच सांग हे असलं कसलं प्रेम ... ?

  ReplyDelete
 5. शोधत होता एक शहाणा, कधी सापडेल माझा किनारा....
  दिवस लोटले तरी शोधतोय का ??? म्हणावं तू एकटाच नाही मित्रा आम्ही असोत सोबतीला  एक दिवस तो कधी येईल, फुलात न जाता प्रशांत फूल होईल ...
  इश्वरी चरनी सांगेन मी, होईल उशीर जरी मिळू दे त्याला हवी जशी [b][red]प्रिया[/red][/b]

  ReplyDelete
 6. शोधत होता एक शहाणा, कधी सापडेल माझा किनारा....
  दिवस लोटले तरी शोधतोय का ??? म्हणावं तू एकटाच नाही मित्रा आम्ही असोत सोबतीला  एक दिवस तो कधी येईल, फुलात न जाता प्रशांत फूल होईल ...
  इश्वरी चरनी सांगेन मी, होईल उशीर जरी मिळू दे त्याला हवी जशी [b][red]प्रिया[/red][/b]

  ReplyDelete
 7. !!.....khup chann.....!!
  kharokhar ...saglyanachi mulinwishyichi mataeaksarkhich aastat ....!!

  ReplyDelete
 8. !!.....khup chann.....!!
  kharokhar ...saglyanachi mulinwishyichi mataeaksarkhich aastat ....!!

  ReplyDelete
 9. !!.....khup chann.....!!
  kharokhar ...saglyanachi mulinwishyichi mataeaksarkhich aastat ....!!

  ReplyDelete