५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

"तो आणी ती"
नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
आज मी एक लघुकथा लिहिण्याचा पहिला प्रयत्न केलेला आहे.
बघा माझा हा प्रयत्न तुम्हाला कितपत आवडतो..चुका
असतील तरी जरुर कळवा.

"तो आणी ती"
****************

©प्रशांत दा.रेडकर
****************

तसे त्याला कळुन चुकले होते की आता फार दिवस उरलेले नाहीत हातामध्ये.परतीचा प्रवास तर कधीच सुरु झाला होता.क्षणा क्षणाला काळ रेती सारखा हातामधुन निसटुन जात होता,प्रवास संपत आल्याची जाणीव करुन देत होता.आयुष्यभर सर्वाना प्रेरणा देत आला,आता जाता जाता सारी दु:ख,यातना स्व:ता सोबत घेवुन जायच्या,त्याही
सहज हसत हसत,कोणाला काही न सांगता,हे त्याने मनाशी ठरवले होते.

मिळतील तितके क्षण आनंदाने जगत होता,हसवत होता,हसत होता...आता तर शरीराने साथ देणे हळूहळू कमी केले,पण मनाची उमेद?...तिला कोणता आजार कमी करु शकेल का?...नाही ना....त्या उमेदीवरच प्रवास सुरु होता जीवना कडुन मरणा पर्यंतचा.

एक दिवस सहज विरंगुळा म्हणुन त्याने नेटच्या जगात प्रवेश केला,वाचनाची आवड शांत बसु देईच ना,म्हणुन काही कविता ग्रुप आणी कम्युनिटीचा तो सदस्य झाला...तसे नेट चे जग भ्रामक,पण इथेही माणसे जोडता येतात...असा त्याचा विश्वास होता...माणसे कशी आहेत ते कळण्यासाठी,ती दिसतात कशी हे कळणे गरजेचे नाही असे हि तो मानत होता.

अशीच एक दिवस शब्दसखी ची कविता वाचनात आली."अरे,ही तर अगदी मनातले लिहिते,अशी त्याला जाणिव झाली.तो ही मग कविताना प्रतिक्रिया देवु लागला...त्याची प्रतिक्रिया वाचली की तिला प्रेरणा मिळायची....शब्दसखीची कविता वाचली की त्याला ही कविता सुचायची.अनोळखी लोकांमध्ये मैत्रीचे नाते किती सहज जुळते,कधी न सांगताही समोरच्याला तुमचे मन कळते, ते कसे?याची उत्तरे मिळू लागली होती...मनाची भाषा मनाला कळू लागली होती.तिच्या प्रत्येक अडचणीच्या क्षणी ती त्याचा सल्ला घेउ लागली होती...मनात दडलेली गुपिते बोलू लागली होती....तिला हि त्याचा आधार वाटु लागला....तो ही तिच्या मुळे पुन्हा लिहु लागला...अजुनही दोघानी एकमेकाला पाहिलेले नव्हते...तो कोण आहे? ते सुद्धा तिला माहित नव्हते.दिवसांमागुन दिवस जात होते,मैत्रिचे फुलपाखरु जीवनगीत गात होते.....पण..........३0 एप्रिल २००८
************

तो:आज डोळ्यां समोर इतके धुके का आहे? काहिच कसे दिसत नाही.देव बाप्पा इतक्यात नाहि रे यायचे मला,अजुन किती से जग पाहिले आहे मी?अजुन खुप कामे बाकि आहेत,ती झाली की नक्कि येतो, मला एक चान्स दे ना मला.शब्दसखी तुला ही सांगायचे राहुनच गेले बघ,पण तुही कधी काही विचरलेस नाही...तसा ही मी थोडा वेंधळाच आहे...कवितां विषयी इतके बोललो कि स्व:ता बद्दल बोलायचे राहुनच गेले...असो बरेच झाले, माझी दु:खे माझ्या सोबतच संपतील.माझ्या व्यथाना तुझ्या कथे मध्ये उगाच स्थान कश्याला दॆऊ?तसे मी सुद्धा तुला पाहिलेले नाहि आणी तू मला.निदान तुझा आवाज तरी ऐकायचा होता एकदा.फक्त एकदा...


१० मे २००८
*********

ती: आज १० दिवस झाले,तो ओनलाईन आलाच नाही..असे अजुन कधीच झाले नाही,की त्याने कविताना रिप्लाय दिलाच नाही...कुठे असेल?काय करत असेल?..मी सुद्धा नेट वरची ओळख म्हणुन माझी सगळी माहिती देवू शकले नाही...देण्यास तशी काही हरकत नव्हती,पण त्याने कधी फारसे वैयक्तिक प्रश्न विचरले नाहीत,ना कधी स्व:ता बद्दल फारसे सांगितले...असे काय घडले असेल?कि माझेच काही चुकले असेल?कुठे शोधू तुला आता?तुझ्या मुळेच माझ्या कविताना अर्थ मिळत होता,त्यातला नेमका अर्थ तुला कळत होता.आता तुच नाहिस तर मी कविता का करु?...प्रश्न प्रश्न आणी नुसते प्रश्न ठेवलेस समोर...निदान उत्तरांसाठी तरी परत ये.....

आरंभ आणी अंत हाच आपल्या
कहाणीमधला दुवा आहे.
आरंभ मी साठवून ठेवलाय,
पण..अंताच्या भयान आठवणींचे काय?
©प्रशांत दा.रेडकर


**********************************************************************************
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

  Blogger Comment
  Facebook Comment

12 comments:

 1. सुंदर आहे खुप...

  ReplyDelete
 2. Manala chatak laun geli hi gosht..

  kharach ka gela to sodun..mazya babtit asa zala asta tar........asa vichar ekdam manala shiun gela..

  Khup sundar try..

  ..Apratimach!!

  ReplyDelete
 3. khup chhan prashant, pan 31 april, date badal..... 31 april ????????

  ReplyDelete
 4. धन्यवाद ऋषी,
  कथा लिहिताना, ३१ ऑगस्ट आणी १० सप्टेंबर
  अश्या तारखा लिहायचा विचार होता,
  पण कथा थोडी भुतकाळातली वाटावी म्हणून,
  शेवटच्या क्षणी तारीख बदलली त्या मुळे तसे झाले :)

  ReplyDelete
 5. मी असाच आहे, संकटांची नाही भिती, तुझ्या मैत्रीचा विश्वास आहे


  प्रिये कधीतरी नक्कीच परत येशील तू,
  हा माझ्या विश्वास आहे...


  वाट पाहित आहे

  ReplyDelete
 6. khup chhan!!!!
  "Shevatachi tadfad" tar ati uttam.
  kahi shabdik chuka aahet, pan ek-don.
  good keep it up.

  ReplyDelete
 7. Chhan ..prateka madhe kahi tari same aaste ...tu jar online aala nahis tar majhe kiti problem hotil
  ..mala tar hee tujya majhya natya sarkhi vatate....anyways gud keep it up

  ReplyDelete
 8. माझी माय मराठी,parth,smita :)
  धन्यवाद

  ReplyDelete
 9. माझी पण अशीच कहाणी आहे.फरक फक्त ऐवढाच कि तिला बघुनच व ती मला बघुनच तिच्या प्रेमात पडोलो नंतर दिवस फक्त ऐकमेकाना बघण्यात निघुन गेले. तीचे नाव माहीत नाही.माहीत आहे फक्त शहर, आता मी सध्या ennginering 3rd yr ला आहे. नेहमी SEMISTER संपल व कधी सुट्या लागल्या की तीच्या त्या शहारात जातो जेथी ती मला 11TH-12TH ला भेटली होती. पण आजून ति मला दिसली पण नाही का?शेवटी एवढच सांगतो की मी तिच्यावर आताही खुप प्रेम करतो.लग्न करणार तर तीच्याशीच नाहीतर लग्नच नाही करणार.
  मिञा तुझी कथा चांगली होती

  ReplyDelete
 10. प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद :-)

  ReplyDelete