जो शहीद हुये हैं उनकी जरा याद रखो कुर्बानी..........
अतिरेक्यानी केलेया भ्याड हल्ल्या मध्ये काही चांगले अधिकारी गमावाले..
याचेच दू:ख खूप जास्त आहे..
शहीद :
1)हेमंत करकरे ATS प्रमुख..
2)विजय साळसकर
3)अशोक कामठे
तुमच्या कर्तुत्वाला सलाम...
वीरमरण आले.
असेच हल्ले होत राहाणार
आणि आम्ही आमचे अधिकारी गमावत राहणार
राष्ट्रीय दुखवता पाळावा अशी घटना आहे .
******************************
युद्धामध्ये जे दुर्बळ असतात ते हरतात आणि त्यांच्या वाटल्या गुलामी येते स्वत: चे रक्षण करण्याचे
सामर्थ्य जेव्हा अंगात असेल तेव्हाच सहिष्णुतेची भाषा मुखा मध्ये छान वाटते. भारतीयावर हल्ले का झाले ?
त्यांच्या वर परक्यानी राज्य का केले?इतिहासाचा शोध घेतला तर उत्तर मिळेल....ते भारतीयांच्या वृत्तीमध्ये आहे..पळकुटी सहिष्णु वृती. स्वातंत्र हे आधी पासून राखायचे असते.....गुलाम झाल्या वर मागायचे नसते...
ज्याच्या मनगटा मध्ये ताकद आहे तोच राज्य करतो.
जो पर्यंत भारतीय बायका त्यांच्या मुलाना बुळगी सहिष्णुता शिकवायचे थाम्बवत नाहित तोपर्यंत या
विषय वर काही उपाय नाही..... शिवाजीला घडवायचे श्रेय जिजाऊला आहे....तसेच आता प्रत्येक आई ने आपल्या
मुलाना शिकवले पाहिजे...घडवले पाहिजे...मी महनत नाही प्रतेक जन शिवाजी बनेल ..पण १% तरी तसे बनता
आले तर महाराष्ट्र च नाही तर देश घडेल...पण या देशाची खंत अशी की येथे प्रतेकाला शिवाजी जन्माला हवा आहे
पण आपल्या घरी नको...
काही जन म्हणतील.....प्रत्येक हिंसा ही एक विकृती आहे ..हिंसेला हिंसेने उत्तर देण्यापेक्षा
ही विकृतीच काढुन टाकता आली तर ??..............
पण मी त्याना विचारू इच्छितो," विकृती कशी काढून टाकणार बरे?....ती काढून टाकायला तो काय शरीराचा
कुजलेला भाग नाही आहे..जो शस्त्र क्रियेने काढून टाकता येइल....जिव जीवस्य जीवनम् ..म्हणजे एक जीवा वर
दुसरया जिवाचे जीवन अवलंबून असते....पण इथे तर मनुष्य जाती मधले लांडगे माणसाचे लचके तोडत आहे....आणि भुकेलेल्या श्रापदा समोर फुलांची माला घेवून गेले तरी तो शिकार करणारच.
काही जन विचारतील," नेहमीच शेजारच्या देशाचाच हात असतो असे म्हणने जर चुकिचे नाही का
वाटत?दुस-याकडे बोट दाख़वत आपण आपली जबाबदारी काही अंशी झटकतो आहोत असे नाही का वाटत."
"पण जे सत्य आहे ते सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ आहे.भारतातल्या सर्व कारवाया मध्ये पाकिस्तानचा
हात आहे..आणि त्याला इथल्या हिरव्यांची साथ आहे....तसे नसते तर हे अतिरेकी इथे काही करू शकले नसते...".
आणखी किती दिवस आपण शहीदाना श्रदांजली देणार?आणि किती दिवस मेलेल्याना २ लाख ५ लाख देवून त्यांचे सांत्वन करत करत राहणार ???युद्धशास्त्र सांगते...की आक्रमण हाच उत्तम बचाव आहे..कारण अश्या वेळी शत्रूची जास्तीत जास्त मनुष्य हानि होते.आता युद्ध सुरु आहे....कारण हेच आजच्या युद्धाचे बदललेले स्वरुप आहे...
काल ते सीमे वर सुरु होते..आज रस्त्या वर ..उद्या ते तुमच्या घरा पर्यन्त पोहोचेल
तेव्हा तुम्ही काय करणार???
जागे व्हा ..
~प्रशांत रेडकर
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
ह्या कारवाईत शहीद झालेल्या हुतात्मा हेमंत करकरे, हुतात्मा शशांक शिंदे, हुतात्मा विजय
ReplyDeleteसाळसकर,हुतात्मा अशोक कामटे यांना त्रिवार वंदन!!!!
atishay khare aahe te
ReplyDelete