५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुमचा इमेल आयडी जो फक्त ६० मिनिट मध्ये डिलीट होतो

तुम्ही जेव्हा नेटवर काही शिकत असता तेव्हा त्या विषयाबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्हाला अनेक ऑनलाइन सुविधा वापरून बघाव्या लागतात,त्यासाठी बर्‍याच ठिकाणी तुम्हाला तुमचा इ-मेल आयडी वापरून रजिस्ट्रर व्हावे लागते तरच तुम्हाला त्या सेवेचा वापर करता येतो..पण बर्‍याच वेळा आपण अश्या ठिकाणी आपला इमेल आइडी नोंदवून नंतर त्या सेवेबद्दल,त्या साईटबद्दल विसरून सुद्धा जातो...आणि मग तुमच्या इमेल आयडी वर spam मेलचा मारा सुरु होतो...दिवसाला १००+ मेल येतात..ते डिलीट करून तुम्ही कंटाळून जाता.
बहुतेक जाणकार लोक यावर उपाय म्हणून अश्या ठिकाणी आपला इमेल आयडी नोंदवण्यासाठी स्वत:चा वापरात नसलेला दुसरा कमी महत्त्वाचा इमेल आयडी वापरतात,पण नवख्या लोकांची जाम तारांबळ उडते.

CO.CC:Free Domain

यावर उपाय काय?
उपाय सोप्पा आहे...असा तात्पुरता इमेल आयडी जो तुम्ही तुम्ही "फ्री" मध्ये बनवून ६० मिनिटांसाठी वापरू शकता आणि जो ६० मिनिटाच्या वापरा नंतर आपोआप डिलीट होतो.
असा इमेल आयडी स्पॅम मेल पाठवणार्‍या कंपन्या विरुद्ध उत्तम उपाय आहे ज्यांचा असा समज असतो की असे मेल पाठवून त्यांचा व्यवसाय वाढेल अथवा त्यांना आर्थिक फायदा होईल.

Guerrilla Mail ही अशी ऑनलाईन सर्विस आहे जी तुम्हाला हवा असलेला तात्पुरता इमेल आयडी बनवून देते ज्यावर तुम्ही ६० मिनिट पर्यंत येणारे मेल पाहू शकता आणि ६० मिनिटाचा वेळ संपला की तो मेल आयडी आपोआप डिलीट होतो...त्यामुळे तुम्हाला येणार्‍या स्पॅम मेल पासून आपोआप संरक्षण मिळते.


हा इमेल आयडी तुम्ही RSS feed वापरून सुद्धा subscribed  करू शकता,जेणे करून तुम्हाला आलेले मेल तुम्ही पटकन पाहू शकता आणि त्यासाठी तुम्हाला त्या साईटचे पेज reload करायची गरज उरत नाही.


हा इमेल आयडी ६० मिनिटां नंतर आपोआप डिलीट होतो..पण गरज असल्यास तुम्ही त्या इमेल आयडीची मुदत पुढील ६० मिनिटांच्या वापरासाठी वाढवून घेवू शकता.
तुमचे काम संपल्या वर तुम्ही तो इमेल आयडी एक तासाची मुदत संपण्या आधी सुद्धा डिलीट करू शकता...त्यासाठी Forget Me  या पर्याया वर तुम्हाला क्लिक करावे लागेल.


आजसाठी इतकेच उद्या पुन्हा भेटूया नविन माहितीसह.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा.रेडकर
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

2 comments: