५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुमच्या घरचे वायरलेस(Wi-Fi) नेटवर्क कसे सुरक्षित ठेवाल?(भाग-२)

तुमच्या घरचे वायरलेस(Wi-Fi) नेटवर्क कसे सुरक्षित ठेवाल? भाग २



तुमच्या घरातील वायरलेस नेटवर्क कसे असुरक्षित असते ते आपण मागच्या भागामध्ये पाहिले आता थोडीशी काळजी घेतली तर ते कसे सुरक्षित करता येईल याची माहिती आपण या भागात करून घेवू...
खाली दिलेल्या माहितीचा वापर करून तुम्ही तुमचे वायरलेस नेटवर्क सुरक्षित ठेवू शकता.


१) तुमच्या router च्या सेटिंग बदला:


प्रथम तुम्ही हे जाणून घेणे गरजेचे आहे की तुमच्या वायरलेस router च्या सेटिंग कश्या बदलाव्यात...त्यासाठी तुमच्या वेब ब्राउसर मध्ये १९२.१६८.१.१ टाईप करा..मग जे पेज ओपन होईल तिथे तुमच्या वायरलेस router चे user name आणि password टाईप करा...तुमच्या वायरलेस router च्या निर्मात्या प्रमाणे ते भिन्न भिन्न असू शकतात....त्यासाठी तुम्ही तुमच्या router चे user manual पाहू शकता.जर ते तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही त्याचा शोध गूगल वर घेवू शकता.
काही प्रसिद्ध router brands – Linksys, Cisco, Netgear, Apple AirPort, SMC, D-Link, Buffalo, TP-LINK, 3Com, Belkin हे आहेत.

२)तुमच्या router चा पासवर्ड बदला:


एकदा का तुम्ही router च्या सेटिंग पानावर लॉग-इन झालात की पहिली गोष्ट तुम्हाला करायची आहे ती म्हणजे तुमच्या router चा "default password" बदली करणे...तुमच्या router च्या सेटिंग पानावरच्या Administration settings वर जावून तुम्ही तो बदलू शकता.default values य़ा शक्यतो admin / password अश्या असतात..त्या बदली केल्याने तुमचा वायरलेस router अधिक सुरक्षित होईल.

तुमचे नेटवर्क हॅक करणारे नेमके करतात काय? 

तर इंटरनेट वरचा पब्लिक डेटाबेस वापरून router चे default यूसरनेम आणि पासवर्ड मिळवतात.
उदाहरनार्थ : Linksys चे router त्याचे default यूसरनेम आणि पासवर्ड जे admin हे आहे ते वापरून कोणीही तुमच्या router च्या सेटिंग बदलू शकते...त्यामुळेच default values बदली केल्याना तुमचा router अधिक सुरक्षित होतो.

३)तुमच्या नेटवर्कचे "SSID(वायरलेस नेटवर्क नाव)" नाव बदला:


मुख्यता तुमच्या नेटवर्कचे "SSID(वायरलेस नेटवर्क नाव)" "default" म्हणजे आधी पासून दिलेले असते किंवा तुमच्या router च्या ब्रान्ड प्रमाणे दिलेले असते (उदा.linksys).
तुमच्या router च्या सेटिंग पानावर basic wireless settings मध्ये जावून तुम्ही तुमच्या नेटवर्कचे SSID बदलू शकता...त्यामुळे दर वेळी नेटवर्क मध्ये कनेक्ट होताना तुम्हाला ते कोणते नेट्वर्क आहे याची माहीती मिळते.म्हणजे तुमच्या परिसरात २ पेक्षा जास्त वायरलेस नेटवर्क असतील तर आपण आपल्याच नेटवर्क आहोत हे त्यामुळे कळते.
कृपया तुमचे नाव,पत्ता किंवा खाजगी माहिती SSID साठी वापरू नका.

हॅकर काय करतात?
inSSIDer (Windows) आणि Kismet (Mac, Linux) सारखी Wi-Fi स्कॅनिंग टूल्स नेट वर मिळतात ती वापरून कोणी ही एखाद्या परिसरातील उपलब्ध असलेल्या Wi-Fi नेट्वर्कची माहीती मिळवू शकते.

४)नेटवर्क Encryption चा वापर करा:

तुमच्या परिसरातील इतर संगणकाना तुमचे इंटरनेटचे कनेकशन वापरता येवू नये म्हणून तुमचे वायरलेस सिग्नल encrypt करा..सोप्प्या भाषेत सांगायचे झाले तर...दुस‍र्या संगणकाना कळणार नाही अश्या भाषेत बदला.
आता झाली ना पंचाईत..ते कसे करायचे बुवा???...ते अगदी सोप्पे आहे.
वायरलेस नेटवर्क मध्ये ब‍र्याच Encryption पद्धती उपलब्ध आहेत. 

उदा.
WEP, WPA (WPA-Personal), WPA2 (Wi-Fi Protected Access version 2).
यातील WEP पद्धत बेसिक आहे त्यामुळे सहज क्रॅक करता येण्यासारखी आहे..पण ही पद्धत सर्व जुन्या उपकरणांमध्ये वापरता येण्यासारखी आहे..
WPA2 पद्धती अधिक सुरक्षित आहे पण फक्त २००६ नंतरच्या उपकरणांमध्येच वापरता येते.

तुमच्या वायरलेस नेटवर्क मध्ये Encryption सुरु कर‍ण्यासाठी प्रथम तुमच्या router च्या configuration सेटिंग पानावर wireless security settings मध्ये जा...तिथे तुम्हाला Encryption पद्धत निवडावी लागेल...जुन्या उपकरणांसाठी WEP पद्धत निवडा आणि नविन उपकरणे असतील तर WPA2.
आता तुम्हाला तुमचे नेटवर्क access करता यावे यासाठी एक की-combination इंटर करावे लागेल..ते असे असले पाहिजे ज्याचा अंदाज बांधणे इतराना कठीन जाईल....या की-combination मध्ये अक्षर,संख्या,स्पेशल कॅरेकटर(#,$,!,~) याचा समावेश असावा म्हणजे असे की-combination क्रॅक करणे कठीण होते.


हॅकर काय करतात?
AirCrack आणि coWPAtty सारखे फ्री टूल्स वापरून कोणीही WEP / WPA (PSK) की-combination क्रॅक करू शकते.

तुमच्या घरातील वायरलेस नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी आणखी काय काळजी घ्यावी ते आपण आता पुढील भागात पाहू
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत रेडकर

CO.CC:Free Domain
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

2 comments: