५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

पोस्टऑफिस मधून Address Proof ID Card कसे मिळवाल?

 जेव्हा एखादा विद्यार्थी शिकण्यासाठी बाहेरगावी जातो किंवा कामानिमित्त तुमची दुसर्‍या जागी बदली होते, तेव्हा अनेक अडचणी येतात..त्यातली मोठी अडचण म्हणजे address proof ची.कारण मोबाईल कनेक्शन घ्यायचे असो किंवा इंटरनेट कनेक्शन,गॅस कनेक्शन,अथवा बॅंक अकांउट उघडायचे असेल तरी address proof हा लागतोच.

हीच अडचण लक्षात घेवून,त्यावर मात करण्याची सोय Indian Postal Department ने केली आहे. Indian Postal Department त्यांच्या पोस्ट ऑफिस मधून address proof सोबत photo id card देण्याची सोय केली आहे. ते कार्ड मिळवायची पद्धत सुद्धा साधी सोप्पी आहे.

खाली दिलेल्या माहितीचा वापर करून तुम्ही ते सहज मिळवू शकता.
 
१)प्रथम जवळच्या पोस्ट ऑफिस मधून address proof साठीचा form घ्या..जो फक्त १० रुपयाना मिळतो.

२)form मध्ये संपुर्ण माहीती भरा आणि मग तो form जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये २४० रुपयांच्या फी सोबत जमा करा.

३)त्यानंतर तुमच्या पत्त्याची शहानीशा करण्यासाठी  Postal Department तर्फे एक postman तुमच्या घरी येईल(तुम्ही दिलेल्या पत्त्या वर)

४)एकदा का तुमच्या पत्त्याची शहानीशा झाली..की काही काळाने तुम्हाला तुमचे address id card मिळेल.

५)संपुर्ण प्रक्रियेला जवळ जवळ २ महिन्याचा कालावधी लागतो.

येणारा खर्च:
१)form फी : १० रुपये.
२)कार्डसाठी द्यावी लागणारी फी:२४० रुपये.
३)renewal फी:१४० रुपये.
४)duplicate :९० रुपये

उपयोग:
१)या कार्डचा वापर तुम्ही identity proof आणी address proof म्हणून करू शकता.

२)हे कार्ड ३ वर्षापर्यंत वैध्य आहे,त्या नंतर त्याचे नुतनीकरन(renewal)करावे लागते.

३)सर्वच पोस्ट ऑफिसमध्ये ही सेवा उपलब्ध नाही आहे..अधिक माहिती साठी तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये चौकशी करावी.

या सेवेबद्दलची अधिक माहिती तुम्ही official Post Office Guide –Section 63 (page no. 65)  वर वाचू शकता.
CO.CC:Free Domain

धन्यवाद.
तुमचा मित्र,
प्रशांत दा.रेडकर
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

2 comments: