नेटच्या जगात काहीच सुरक्षित नसते, तसाच तुमचा ब्लॉग सुद्धा नाही...कधी ही काही ही घडू शकते आणि तुमची आतापर्यंत ब्लॉगसाठी घेतलेली मेहनत फूकट जावू शकते.योग्य ती काळजी घेतली तर तुम्ही तुमच्या ब्लॉग मधले साहित्य,नोंदी वाचवू शकता.गेल्या वर्षी अनेक ब्लॉग गूगलच्या चूकीमुळे Spam म्हणून नोंदवले गेले होते. असे तुमच्या ब्लॉगच्या बाबतही कधीही घडू शकते. यावर उपाय एकच आपल्या ब्लॉगचा वेळोवेळी बॅकअप घेणे.
अशी अनेक सॉफ़्ट्वेअर आहेत ज्यांनी तुम्ही तुमच्या अथवा दुसर्या कोणाच्याही ब्लॉगची हुबेहुब नक्कल तुमच्या संगणकावर सेव्ह करू शकता..पण त्यांची माहिती मी इथे देण्याचे मुद्दाम टाळत आहे कारण त्याचा गैरवापरच होण्याची जास्त शक्यता आहे. :-)
आता आपण आपल्याला ब्लॉगर.कॉम ने दिलेल्या सुविधेचा ब्लॉगचा बॅकअप(Backup) घेण्यासाठी वापर कसा करायचा ते पाहू :-)
१)प्रथम तुमच्या अकाउंट वर लॉग-इन व्हा.
२)(नविन बदल)ब्लॉगरच्या बदललेल्या नविन स्वरुपानुसार तुमच्या ब्लॉगच्या नावासमोरील घराच्या आकारच्या चिन्हावर टिचकी दिल्यावर जो layout पर्यांय दिसतो त्याच्यावर टिचकी द्या
३)आता त्या ब्लॉगच्या Settings वर क्लिक केल्यावर Blog Tools नावा समोर तुम्हाला Import blog - Export blog - Delete blog असे ३ पर्यांय दिसतील.
४)त्यातील Export blog या पर्यायावर क्लिक करा
५)Export your blog या मथळ्याखाली तुम्हाला एक सुचना दिसेल आणि तिथेच Download Blog नावाचा पर्यांय दिसेल.
त्यावर टिचकी द्या(click करा) :-)
६)चित्रात दाखविल्याप्रमाणे एक विंडो उघडेल त्यात Ok वर क्लिक करा आणि तुमच्या ब्लॉगची बॅकअप कॉपी तुमच्या संगणकावर सुरक्षित जागी ठेवून द्या.
७)तुमच्या ब्लॉगच्या बाबतीत काही अघटित घडल्यावर,या बॅकअप कॉपीचा तुमचा ब्लॉग Restore करण्यासाठी कसा वापर करायचा ते आपण पुढच्या भागात पाहू या.
ब्लॉगिंगचे इतर तंत्र-मंत्र जाणून घेण्यासाठी तुम्ही ब्लॉगिंगचे तंत्र-मंत्र या लिंकचा वापर करू शकता.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment