५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुमचा हरवलेला किंवा चोरलेला मोबाईल ब्लॉक(Block) कसा कराल?

 माझ्या एका मैत्रिणीचा मोबाईल पुण्यात असताना चोरीला गेला आणि कालच तिचा मला मॅसेज आला की चोरलेला मोबाईल परत कसा मिळवावा?



काही नविन हॅडसेट मध्ये अशी सोय आहे की त्यात असलेले सिम कार्ड बदली झाले की त्या मोबाईलच्या मुळ मालकाला तसा sms गुप्तपणे पाठवला जातो..पण सर्वच मोबाईल मध्ये अशी सोय नसते, तरी देखिल तुम्ही तुमचा तुमचा हरवलेला किंवा चोरलेला मोबाईल ब्लॉक करू शकता.

प्रत्येक मोबाईलला एक IMEI नंबर असतो,तो प्रत्येक मोबाईल साठी unique असतो,म्हणजे एका मोबाईलला दिलेला IMEI नंबर हा फक्त त्याच मोबाईलसाठी असतो.
आता तुम्ही विचाराल IMEI म्हणजे काय?
IMEI म्हणजे International Mobile Equipment Identification.

तुमच्या मोबाईल वर  *#06# टाइप केल्यावर तुम्हाला तो नंबर तुमच्या मोबाईल स्क्रीन वर दिसतो.तोच नंबर नंतर तुमचा चोरीला गेलेला अथवा हरवलेला मोबाईल शोधण्यासाठी उपयोगी पडतो.
तुम्ही आताच तुमच्या मोबाईलचा IMEI नंबर लिहून सुरक्षित ठिकाणी ठेवून द्या.जर लिहून ठेवायला विसरला असाल तर आताही तो तुम्हाला mobile handset च्या बॉक्स वर सापडेल.

तुम्ही जेव्हा मोबाईल switch on  करता तेव्हा तुमचे सिम (SIM)   उपलब्ध नेटवर्क सोबत connect होण्याचा प्रयत्न करते.जेव्हा त्याला योग्य ते नेटवर्क मिळते तेव्हा ते तुमच्या मोबाईल handset आणि नेटवर्क टॉवर मध्ये connection निर्माण करते.या मध्ये तुमचे सिम mobile IMEI number, mobile model, version इत्यादीची माहिती तुमच्या नेटवर्क ऑपरेटरला पुरवते.याचा अर्थ असा की जेव्हा जेव्हा तुम्ही तुमचा मोबाईल switch on करता तेव्हा तेव्हा ही माहिती तुमच्या नेटवर्क ऑपरेटरला मिळत असते.

त्यामुळे तुमचा मोबाईल चोरीला गेला अथवा हरवला तर तुम्ही तुमच्या मोबाईल नेटवर्क ऑपरेटरशी संपर्क करून त्याला तो IMEI number ब्लॉक (Block)करायला सांगू शकता.

ते तुमच्याकडे कदाचीत पोलीस FIR(Police FIR )ची कॉपी मागतील.त्यांनी सांगितल्या प्रमाणे करा. शेवटी ते तो IMEI number ब्लॉक करतील.कारण मोबाईलचा IMEI number ब्लॉक  करण्यासाठी Mobile network providers एकच शेअर होस्टिंग सर्विस वापरतात,त्यामुळे तुम्ही VodaFone ला तुमच्या मोबाईलचा IMEI number ब्लॉक करायला सांगितले तर Reliance’, ‘Idea Cellular’ ’Aircel’ इत्यादी सर्वच नेटवर्क वर तुमच्या मोबाईलचा IMEI number ब्लॉक होतो.त्यामुळे चोराने तुमचा मोबाईल चोरून दुसरे SIM वापरले तरी जेव्हा जेव्हा ते SIM नेटवर्कशी connect होईल तेव्हा तेव्हा तुमच्या IMEI number ची माहिती नेटवर्क ऑपरेटरकडे जाईल आणि तो mobile handset ब्लॉक (Block)होईल. त्यामुळे तो त्याना कधीच वापरता येणार नाही.

जर तो mobile परत मिळवायचा असेल तर, mobile network ऑपरेटर कडून त्या मोबाईल नंबरची माहिती मिळवता येईल(पुढचे काम पोलिसांचे आहे.)
धन्यवाद.

तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

4 comments:

  1. khup upayukt mahti deli ahe apan . tumche articles khup changle ahet.

    ReplyDelete
  2. this doesnt work in practice unless you are a VIP person

    http://blog.kiranghag.com/2006/10/burgalary-in-house.html

    ReplyDelete
  3. हे प्रॅक्टिकली होते..मध्यांतरी चोरबाजारातून चोरलेले मोबाईल घेणार्‍या व्यक्तींकडून पोलिसांनी अश्याच प्रकारे मोबाईल परत मिळवले होते

    ReplyDelete