बर्याच वेळा काय होते, चुकून क्लिक होते आणि अपघाताने सुद्धा तुमचा ब्लॉग डिलीट होतो,तसेही तुम्ही जरी ब्लॉग डिलीट केला असेल तरी ब्लॉगर.कॉम(Blogger.com)तुमचा ब्लॉग ९० दिवस डिलीट करत नाही, त्यामुळे तुम्ही तुमचा डिलीट झालेला ब्लॉग परत मिळवू शकता. (जर तुम्ही तुमचे अकांउट डिलीट केले तर ब्लॉग परत मिळवणे शक्य नाही)
खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करा.
१)प्रथम तुमच्या अकाउंट वर लॉग-इन व्हा. २)त्यानंतर तुमच्या Dashboard वरील Manage Blogs पर्यांया वर जावून Show All वर क्लिक करा. ३)Show All केल्यावर त्या लिस्ट मध्ये तुम्हाला तुमच्या डिलीट केलेल्या ब्लॉगचे नाव सुद्धा दिसेल. ४)डिलीट केलेल्या ब्लॉगच्या नावासमोर Undelete this blog नावाचा पर्यांय दिसेल.त्याची निवड करा.
५)अरे वाह, तुमचा डिलीट झालेला ब्लॉग तुम्हाला परत मिळाला.
धन्यवाद.
नमस्कार,
मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.
1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.
**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.
**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.
कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट
४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे
savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra
धन्यवाद :-)
0 comments:
Post a Comment