५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

सावधान,तुमचे Facebook किंवा Twitter Account हॅक (Hack) होवू शकते.

 तुम्ही तुमच्या ऑफिस अथवा कॉलेज मध्ये unsecured wifi नेटवर्क असलेल्या संगणका वरून Facebook किंवा Twitter अकांउट वापरत आहात का? तसे असेल तर तुम्हाला तुमच्या अकांउटच्या सुरक्षितते बाबत विचार करायची वेळ आली आहे समजा.
जेव्हा जेव्हा तुम्ही facebook किंवा twiiter account वर लॉग-इन करता तेव्हा तुम्ही जर browser चा address bar  पाहिला तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे http://www.facebook.com/home.php? असे काहीसे दिसेल.

म्हणजे अजुन सुद्धा या साईट http protocol चा वापर करतात.खरे तर secured https protocol चा वापर करणे गरजेचे आहे.कारण तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल तुम्ही जेव्हा तुमच्या gmail account  वर लॉग-इन करता तेव्हा https protocolचा वापर झालेला असतो...जो जास्त सुरक्षित आहे.

याच गोष्टीमुळे तुमचे Facebook आणि Twitter चे पासवर्ड Wifi  वर सहज कोणीही हॅक करू शकेल..

हे कसे घडते?


१)firefox browser साठी Firesheep नावाचे freeware extension  मिळते.

२)एकदा का ते इनस्टॉल केले की ते तुमच्या firefox browserच्या sidebar विंडो मध्ये उघडते.

३)एकदा उघडल्यावर ते तुम्हाला आता जे लोक unsecured wifi network मध्ये आहेत त्या सर्वांची यादी दाखवते.एकदा का ते लोक त्यांच्या फेसबूक अथवा twitter account मध्ये login झाले की तुम्हाला एक notification मिळते आणि फक्त एका क्लिक ने तुम्ही सहज त्यांच्या अकांउट मध्ये login होता.

आहे की नाही हे धक्कादायक.

४)ही संपुर्ण पद्धत cookie hijacking या technique वर काम करते.एकदा का तुमच्या cookie  हॅक झाल्या की कोणीही सहज तुमच्या अकांउट मध्ये login होते. आणि unsecured wifi network वर अश्या cookies चोरणे सोप्पे जाते.

खबरदारीचे उपाय:

१)unsecured wifi networks वरून  Facebook आणि Twitter वर लॉग-इन करणे टाळा.
२)http protocol ऐंवजी secured https protocol चा वापर करा.
उदा.https://www.facebook.com/
धन्यवाद मित्रांनो
काळजी घ्या.
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर



CO.CC:Free Domain
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment