अजुनही तुमच्या नावावर ब्लॉग नसेल तर तुम्ही मी याआधी ब्लॉगिंगचे तंत्र-मंत्र या भागात लिहिलेले लेख आणि व्हिडिओ पाहून तो सहज तयार करू शकता.
त्यासाठी खाली दिलेल्या दुव्यांचा वापर तुम्ही करू शकता
१)तुमचा पहिला ब्लॉग कसा तयार कराल?
२)तुमचा पहिला लेख कसा लिहाल?
३)तुमच्या ब्लॉगच्या टेंम्प्लेटचा बॅकअप कसा घ्याल?
४)तुमच्या ब्लॉगचे टेंम्प्लेट रिस्टोर कसे करावे?
५)तुमच्या ब्लॉगसाठी मॅगजीन स्टाईल टेंपलेट्स (Magazine style templates)
६)तुमच्या ब्लॉगसाठी disclaimer Policy कशी लिहाल?
७)तुमच्या ब्लॉगसाठी Privacy Policy कशी लिहाल?
८)तुमचा ब्लॉग जगभर दिसतो कसा ते कसे पाहाल?
याच लेखमालेतील पुढचा लेख मी लिहित आहे...तेही तांत्रिक गोष्टींचा जास्त ऊहापोह न करता :-) तो म्हणजे "तुमच्या ब्लॉगसाठी फ्री डोमेन नेम(Free Domain) कसे मिळवाल?"

आधी लिहिलेले लेख वाचून आता पर्यंत तुम्ही तुमचा ब्लॉग तयार केला असेल?
तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल ती म्हणजे तुमच्या ब्लॉगच्या नावामध्ये ".blogspot.com" "WordPress.com" असे काहीतरी दिसते.
उदाहरनार्थ:
http://xyz.blogspot.com
http://xyz.wordpress.com
यात ".blogspot.com" ".wordpress.com" ही झाली मुख्य डोमेन नेम आणि त्यावर जे xyz आहे ते झाले सबडोमेन...
असो जास्त खोलात न जाता इथे जे गरजेचे आहे ते आपण पाहूया. :-)
जर तुम्हाला तुमच्या ब्लॉगसाठी .com,.in,.info,.net अशी डोमेन नेम हवी असतील तर तुम्हाला वर्षाला ठराविक रक्कम भरून ती तुमच्या नावावर रजिस्टर करणे गरजेचे असते.
उदा. तुमच्या ब्लॉगचे नाव मग
http://xyz.com
http://xyz.in
http://xyz.info
असे काहीसे दिसेल..हे झाले तुमचे स्वत:चे डोमेन...जर तुम्ही हौशी ब्लॉगर असाल तर तुम्हाला अशी डोमेन नेम खरेदी करण्याची गरज नसते.तुम्ही पैसे खर्च न करता सुद्धा फ्री डोमेन मिळवू शकता,
कसे??? ते आज मी तुम्हाला मिळवून देणार आहे, तुमच्या ब्लॉगसाठी फ़्री डोमेन. :-)
मित्रांनो खाली दिलेल्या पद्धतीचा अवलंब करा आणि तुमच्या ब्लॉगसाठी फ़्री डोमेन नाव ५ मिनिटामध्ये मिळवा.
तुमच्या ब्लॉगसाठी फ़्री डोमेन कसे मिळवाल?
co.cc च्या डोमेन वर गुगलने बंदी घातल्यामुळे त्याचा वापर आता बंद झाला आहे..त्यामुळे या पोस्ट मधून तो भाग आता वगळण्यात आलेला आहे. त्याऐवजी तुम्ही .tk डोमेन मोफत मिळवू शकता.
त्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर जा
http://www.dot.tk/en/index.html?lang=en
आजसाठी इतकेच पुन्हा ब्लॉगिंगचे तंत्र-मंत्र घेवून तुमच्या भेटीला मी लवकरच येईन
धन्यवाद.
तुमचा मित्र,
प्रशांत दा.रेडकर
Thanks lot, आपले खुप-खुप आभार. अतिषय महत्वाची माहिती दिल्याबद्द्ल.
ReplyDeleteभूपेश, पुणे
धन्यवाद भुपेश :-)
ReplyDeletekhup khup aabhari aahe mast mahite hoti....................
ReplyDelete