५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

फेसबूक,ऑर्कुट वरच्या जाहिराती कश्या ब्लॉक कराल?

मंडळी माझ्या ब्लॉगचा वाचक विराज याने मला प्रश्न विचारला होता...की फेसबूक,ऑर्कुटवर अथवा इतर साईट वर ज्या जाहिराती दाखवल्या जातात त्या कायम स्वरूपी बंद करता येतील का?मी याचा शोध घेतला आणि मला त्याचे उत्तर मिळाले.आता असे करणे सहज शक्य आहे..याचे फायदे म्हणजे तुमच्या नेटचीबॅन्डविथ तर वाचतेच,त्याच सोबत तुम्हाला नको त्या जाहिराती पहात बसावे लागत नाही.हे कसे कराल?


१)या साठी तुमच्या संगणकावर mozilla firefox हा ब्राऊजर असणे गरजेचे आहे.

२)आता खालील दिलेल्या लिंक वरून तुम्हाला एक Add on इनस्टॉल करावे लागेल.
हे Add on सर्व प्रकारच्या जाहिराती ब्लॉक करते.डाउनलोड करण्यासाठी "ABP" या लिंक वर टिचकी द्या.
मग उघडणार्‍या पानावरील उजव्या कोपर्‍यातील
वर टिचकी द्या.

३)असे केल्याने जे नविन पान उघडेल त्यात चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे एक पर्यांय दिसेल,त्यावर टिचकी द्या.

४)या नंतर allow वर टिचकी द्या.


५)डाउनलोड पुर्ण झाल्यावर तुमचा mozilla firefox ब्राऊजर restart करा.

६)आता mozilla firefox ब्राऊजर restart झाल्यावर खाली चित्रा मध्ये दाखविल्या प्रमाणे
पान दिसेल,त्यातील subscribe या पर्यांयावर टिचकी द्या.

७)हे करून झाले की तुमच्या firefox ब्राऊजर वरील उजव्या कोपर्‍याला ABP असे लाल रंगातील चिन्ह 
दिसेल.

त्या वर टिचकी देऊन तुम्ही हवे तेव्हा ते सुरू अथवा बंद करू शकता,इतकेच नाही तर कोणत्या web Site वरच्या जाहिराती पहाव्या अथवा पाहू नयेत हे सुद्धा तुम्ही ठरवू शकता.जेव्हा गरज नसेल तेव्हा चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे Enable Adblock Plus समोरील टिचकी काढून तुम्ही ते बंद करू शकता.

८)आता लगेच हे Add on इनस्टॉल करा आणि Facebook,orkut,google अथवा नेट वरच्या कोणत्याही web Site वरच्या जाहिराती बंद करा.

९) आवडले तर प्रतिक्रिया नक्की द्या.

९)हे कसे करायचे ते अजुन कळले नसेल तर या व्हिडिओ वर त्याचे प्रात्यक्षिक तुम्ही पाहू शकता.

अश्या अनेक उपयुकत टिप्स आणि ट्रिकससाठी
प्रशांत रेडकर सोबत फ़ेसबूक वरचे पान लाईक करायला विसरू नका.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

  Blogger Comment
  Facebook Comment

3 comments:

 1. नमस्कार मी अभय शेजवळ मी नुकताच मराठीनेटभेटब्लॉगकट्टा बनविला आहे. तिथे आपला छानसा ब्लॉग जोडण्यात आला आहे, जर आपणाला आपला ब्लॉग तेथून हटवायचा असल्यास
  संपर्क या पर्याय वापरून आपण आपला ब्लॉग ब्लॉगकट्ट्यातून हटवू शकता.
  धन्यवाद

  ReplyDelete