५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

गुगल भारतीयाना कसे फसवत आहे?

मंडळी गुगल कडून भारतीयांची फसवणूक सुरु आहे...तुम्हा सर्वांना माहितच असेल की चीनने अरुणाचल वर आपला हक्क सांगितला आहे,गुगल त्याना या कामी मदत करत आहे आणि भारतीयांना वेडे समजून स्वत:चा धंदा करत आहे.

गुगल भारताच्या नकाशाची ३ वेगवेगळी रूपे दाखवत आहे,भारताच्या नकाशाचे अमेरीकन,भारतीय आणि चीनी स्वरूप गुगलने वेगवेगळया प्रकारे सादर केले आहे.त्यांचा समज असेल की त्यांची ही लबाडी पकडली जाणार नाही.


भारतीय नकाशामध्ये गुगलने अरुणाचल प्रदेश हा भारताचा भाग दाखवला आहे.
खालील लिंक वर जावून तुम्ही ते पाहू शकता.


http://maps.google.co.in/
अथवा खालील चित्र पहा.
       

पण अमेरीकन आणि जगातील इतराना अरूणाचल प्रदेश,काश्मीर हे वादग्रस्त प्रदेश म्हणून दाखवले आहेत.
खालील दुव्यावर ते तुम्ही पाहू शकता अथवा चित्र बघा.
http://maps.google.com/


चीनी स्वरूपामध्ये अरूणाचल प्रदेश हा भारताचा भागच नाही आहे असे दाखवले आहे..म्हणजे याचा अर्थ असा समजावा का की गुगल ने अरूणाचल प्रदेश हा चीनचा भाग आहे हे मान्य केले आहे? की गुगलने ते चीनला देवू केले आहे?

हे तुम्ही खालील दुव्यावर पाहू शकता अथवा चित्र बघा.

http://ditu.google.com/


धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

  Blogger Comment
  Facebook Comment

8 comments:

 1. हे धंदेवाईक लोक आहेत, आपली आय, माय सुद्धा वेळ पडलीतर विकायला काढतील.

  ReplyDelete
 2. भारत सरकारने वेळीच हस्तक्षेप केला पाहिजे

  ReplyDelete
 3. bharatat google ban karayla hawe
  !!

  ReplyDelete
 4. आपल सध्याच सरकार लाचार आहे....ते काही करणार नाही :(

  ReplyDelete
 5. सरकारने खर तर काही तरी केले पाहिजे..पण ते वेगळ्याच गोष्टी मध्ये व्यस्त असते...भारत सरकारने स्वत:चा इंटरनेट सर्व्हर बनवला तर बर्‍याच प्रकारांवर नियंत्रण मिळवता येईल

  ReplyDelete
 6. यासाठी कडक कायदा पाहीजे काही अडत नाही गुगुल नसेल तर ......
  आणि प्रशांतजी उजव्याबाजूला खालच्या कोपऱ्यात इमेज कशी टाकायची ते लिहा एकदा...

  ReplyDelete
 7. जोपर्यंत असे भ्रष्ट मंत्री आहेत तो पर्यंत असेच चालेल. pok (pak occupied kashmir) चे पन असेच फोटो दाखवले जातात.

  ReplyDelete
 8. अविनाशजी ब्लॉगिंगचे तंत्र-मंत्र मध्ये मी या विषयी सविस्तर लिहिणार आहे पुढे. :-)
  आशीष हो पाक व्याप्त काश्मीर तर फार पुर्वी पासून दाखवतात पण आता अरुणाचल वर चीन ने दावा सांगितल्यावर गुगलने हे धंदे सुरु केले :-/

  ReplyDelete