५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुमच्या ब्लॉगवर स्टार रेटिंग आणि संबंधित धागे दर्शविणारे कोड कसे समाविष्ट कराल?

मंडळी,बर्‍याच वेळा ब्लॉगिंग करताना तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की एक तर कमेन्ट मॉडरेशन मुळे अथवा नेट सर्फिंग करताना घाईत असल्या मुळे वेळे अभावी वाचकाना तुमच्या पोस्टला रिप्लाय देणे दर वेळी जमतेच असे नाही.मग या वर उपाय काय? तर तुमच्या ब्लॉग पोस्ट सोबत स्टार रेटिंग आणि इतर संबंधित धागे दर्शविणारे कोड समाविष्ट करणे
आज आपण अगदी सोप्या पद्धतीची माहिती करून घेणार आहोत..जे कोडींग बद्दल फारशी माहिते नसलेल्याना सुद्धा सहजपणे करता येईल..पुढील भागात थोडया कठिण पद्धतीची आपण माहिती करून घेवू,

हे कसे कराल?



१)प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी द्या.

star-rating


२)आता जे पान उघडेल त्यावरील तुमच्या संगणकाच्या पडद्याच्या वरच्या कोपर्‍यात दिसणार्‍या Register या पर्यांयावर टिचकी द्या.

३)आता उघडलेल्या पानावर आवश्यक ती माहिती भरून झाल्यावर I agree समोर टिचकी देवून झाल्यावर Register वर टिचकी द्या.

४)या नंतर लॉग-इन वर टिचकी देऊन साईन-इन व्हा.

५)Manage Blogs मध्ये जा आणि Add Blog वर टिचकी देवून तुमचा ब्लॉग समाविष्ट करा.

६)Widget Customization मध्ये योग्य त्या पर्यांयांची निवड करा.

७)या नंतर Get Blog Widgets वर टिचकी देवून योग्य ते पर्यांय निवडा आणि Get Blog Widgets मध्ये Blogger ची निवड करून टिचकी द्या.

८)या नंतर Blog URL चा पत्ता देवून install वर टिचकी द्या.

९)हे करताना तुम्ही तुमच्या ब्लॉगर खात्यावर लॉग-इन असणे गरजेचे आहे.

१०)असे केल्याने ते Widget तुमच्या ब्लॉगच्या पेज एलिमेन्ट मध्ये install होईल.

११) आता सेव्ह केल्या नंतर तुमच्या ब्लॉग वर प्रत्येक पोस्ट खाली स्टार रेटिंग आणि संबंधित धागे दिसू लागतील.

धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment