मंडळी तुम्ही एखाद्या वेबसाईटवर जाता तेव्हा तुम्हाला त्यावर जाहिराती दिसतात..तश्या त्या दिसणे स्वाभाविक आहे,कारण त्यावरच त्यासाईट सुरु राहण्याचा खर्च निघत असतो.पण तुम्ही कधी एक गोष्ट लक्षात घेतली आहे का? तुम्ही या साईट वर जाण्याआधी दुसरी एखादी साईट पाहिलेली असते..उदा. लग्न जुळवणारी साईट अथवा ऑनलाईन खरेदीची साईट, या नंतर तुम्ही त्यासाईट साईट वर जाता आणि त्या साईटच्या जाहिरात विभागात नेमकी लग्न अथवा ऑनलाईन खरेदीची साईट तुमचे लक्ष वेधून घेते आणि तुम्ही त्यावर टिचकी देता..अश्याने त्या साईटला ठराविक उत्पन्न मिळते.पण तुम्हाला या विषयाची जाहिरात आताच दाखवणे गरजेचे आहे,हे या साईटला कसे कळले? हा प्रश्न कधी तुमच्या मनात आला आहे का?
ही माहिती तुमचा वेबब्राउजर ज्यातून तुम्ही ती साईट पाहात आहात तोच त्या वेबसाईटला पुरवत असतो.म्हणजे तुमची खाजगी माहिती (तुम्ही पाहिलेल्या वेबसाईट,नेटवर गुगल मार्फत शोधलेले शब्द इत्यादी) वापरूनच तुमच्या आवडीच्या संबंधित जाहिराती तुम्हाला दाखवल्या जातात.
हे कसे थांबवाल?
मंडळी आता हे थांबवणे सहज शक्य आहे...फायरफॉक्स ५ ब्राउजर मुळे हे सहज शक्य झाले आहे.
१)जर तो तुमच्या संगणकावर प्रस्थापित नसेल तर तुम्ही नेटवरून डाऊनलोड करून तुमच्या संगणकावर प्रस्थापित करू शकता.
खालील दुव्या वरून (mozilla firefox Beta)तुम्ही तो डाऊनलोड करू शकता.
http://www.mozilla.com/en-US/firefox/channel/
२)आता प्रथम तुमच्या संगणकावरील फायरफॉक्स ब्राउजर उघडा.
३)त्या नंतर Tools->>Options->>privacy मध्ये जा.
या ठिकाणी तुम्हाला Tracking:Tell web sites I do not want to be tracked नावाचा पर्यांय दिसेल. त्या समोर टिचकी द्या. आणि मग Ok वर टिचकी द्या.
४)असे केल्याने या पुढे कोणत्याही web sites ना तुमच्या ब्राउजर मधून तुमच्या खाजगी माहितीचा मागोवा घेता येणार नाही.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment