मंडळी आज आपण जीमेल खात्यातले सर्व मेल एकाच वेळी कसे डिलीट करायचे?याची माहिती करून घेणार आहोत.बर्याच वेळा काय होते आपण मेल पाहतो आणि ते नंतर परत वाचून पाहावे म्हणून ठेवून देतो..मग वेळ नसल्यामुळे ते तसेच साठत जातात.
एखाद दिवशी आपल्या लक्षात येते की आपल्या इनबॉक्स मध्ये १००० च्या आसपास मेल जमा झाले आहेत,जे काहीच उपयोगाचे नाही.मग इतके मेल डिलीट करायचे तरी कसे?
हे करणे एकदम सोप्पे आहे.
हे कसे कराल?
१)प्रथम तुमच्या जीमेल खात्यावर जा. त्यानंतर Archive समोरील चौकोना मध्ये टिचकी द्या.
असे केल्याने तुम्हाला All ** conversations on this page are selected. असा संदेश दिसेल.
२) त्या समोरच "Select all *** conversations in Inbox" असा मजकूर दिसेल त्यावर टिचकी द्या.
३)असे केल्याने All *** conversations in Inbox are selected. असा मजकूर दिसू लागेल.
४)आता डिलीट पर्यांयाचा वापर करा आणि तुमचा संपुर्ण Inbox
एका क्षणात रिकामा करा.
जीमेल टिप्स आणि ट्रिक्स विभागात तुम्हाला अधिकाधिक जीमेल टिप्स वाचता येतील.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.
0 comments:
Post a Comment