५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

पाच मिनिटात तुमची स्वत:ची सोशल नेटवर्किंग साईट बनवा.

मंडळी या आधीच्या भागांमध्ये आपण ब्लॉगिंगच्या अनेक तंत्रमंत्रांची माहिती घेतली.आतापर्यत तुमचा ब्लॉग अद्यवत झाला असेलच.जे अजुनची या क्षेत्रात नविन आहेत ते ब्लॉगिंगचे तंत्र-मंत्र विभागात त्यांच्या ब्लॉगिंगचा श्रीगणेशा करू शकतात.त्यात काही कठिन नाही..हे खुपच सोप्पे आहे.

आतापर्यंत आपण चर्चापीठ बनवण्यापासुन तुमचे सोशल नेटवर्क कसे बनवाल याची माहिती घेतली..या आधीच्या २ भागामध्ये तुम्ही ते वाचू शकता.
आज आपण आणखी एका पद्धतीने केवळ पाच मिनिटात तुमची स्वत:ची सोशल नेटवर्किंग साईट कशी बनवायची त्याची माहिती करून घेणार आहोत.चला तर मग सुरु करु या. :-)
माझी अश्या पद्धतीन बनलेली आणखी एक सोशल नेटवर्किंग साईट खालील दुव्यावर टिचकी देवून तुम्ही पाहू शकता.



हे कसे कराल?

१)प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी द्या.


२)आता जे पान उघडेल त्यावर तुम्हाला चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे "Create your own free Social Network" असे लिहिलेला भाग दिसेल त्यातील रिकाम्या जागे मध्ये तुमच्या नेटवर्कचे नाव लिहून Start Now वर टिचकी द्या.


३)या नंतर १Minute-Creation of your Network असे लिहिलेला एक फॉर्म दिसेल. त्यात तुम्हाल सर्व माहिती द्यायची आहे.

*Domain इथे तुम्हाला तुमच्या नेटवर्कचा जो इपत्ता हवा आहे,त्याची निवड करा. आणि मग ".mixxt." च्या बाजुला असलेल्या डॉपडाऊन मेनू मधून हव्या त्या पर्यांयाची निवड करा.


*Name your network तुमच्या नेटवर्कचे नाव द्या.


*Subtitle मध्ये तुमच्या नेटवर्कचे उद्देश काय आहे ते लिहा.


*Category मधून योग्य त्या पर्यांयाची निवड करा.


*Member names पर्यांयासमोर सदस्यांचे खरे नाव दाखवायचे की टोपणनाव त्याचा विचार करून *Real names अथवा *Nicknames यापैकी योग्य पर्यांय निवडा.


*Visibility पर्यांया मधून तुमचे नेटवर्क खाजगी करायचे की सर्वांसाठी खुले याची निवड करा.

*Features मधील सर्व पर्यांयासमोर टिचकी द्या.


*Style मधून तुमच्या नेटवर्के साठी योग्य ते template निवडा.


*यानंतर Terms of Service मध्ये Yes, I have read the terms and accept them. समोर टिचकी द्या. आणि मग Create network now! या शेवटच्या पर्यांयावर टिचकी द्या.



४)असे केल्यावर एक नविन पान उघडेल त्यात तुमची माहिती इपत्ता इत्यादी भरून Sign Up वर टिचकी द्या.


५)असे केल्यावर पुढच्या पानावर न कळणा‌र्‍या भाषेतला संदेश दिसेल..त्याचा अर्थ तुमच्या इपत्त्या वर पडताळणी करणारा मेल पाठवण्यात आलेला आहे असा होतो.



६)आता तुमचे इमेल खाते उघडा..त्यात तुम्हाला आलेल्या पडताळणी मेल मधील दुव्यावर टिचकी द्या. 


असे केल्याने तुमच्या खात्याची पडताळणी पुर्ण होईल आणि तुम्ही तुमचा इपत्ता आणि परवलीचा शब्द वापरून तुमच्या सोशल नेटवर्किग साईट वर लॉग-इन करू शकता.

७)बाकी जे काही बदल करायचे ते तुम्हाला तुमच्या सोईने साईट वर दिलेले पर्यांय वापरून करता येतील.अश्या अनेक गोष्टींची माहिती करून घेण्यासाठी फेसबुक वरचे पान लाईक करायला विसरू नका.


धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment