५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

स्वत:चे मोफत ऑनलाईन वर्तमानपत्र कसे सुरु कराल?


मित्रमैत्रिणींनो आज आपण आपले स्वत:चे मोफत ऑनलाईन वर्तमानपत्र कसे सुरु कराल? याची माहिती करून घेणार आहोत.

हे कसे कराल?

१)प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी द्या.





२)जे पान उघडेल त्यावर सर्वात वर  कोपर्‍याला Start a paper नावाचा पर्यांय दिसेल त्यावर टिचकी द्या.

३)असे केल्याने तुम्हाला चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे Sign in using your account with twitter or facebook असे पर्यांय़ दिसतील.

४)त्यातील आपण facebook पर्यांयावर टिचकी देवू या.असे केल्याने Log in to use your Facebook account with Paper.li. असा संदेश दर्शवणारी खिडकी उघडेल त्यात तुमच्या फेसबुक खात्याचा पडताळणीचा तपशील म्हणजे तुमचा इपत्ता आणि परवलीचा शब्द भरा व लॉग-इन वर टिचकी द्या.

५)असे केल्यावर तुम्हाला त्या साईट वर प्रवेश मिळेल आणि जे पान उघडेल त्यावर चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे वेगवेगळे पर्यांय असतील.

६)Title पर्यांयासमोर तुम्ही तुमच्या वर्तमानपत्राचे तुम्हाला हवे असलेले नाव द्या.

७)Content streams: मध्ये तुम्हाला Add a stream पर्यांयाचा वापर करून तुमच्या वर्तमानपत्रात ज्या बातम्या दाखवायच्या आहेत त्याचे RSS Feed अथवा Twitter #tag अथवा फेसबुक वरचे  keywords, तुम्ही समाविष्ट करू शकता.

८)भाषेची निवड करून झाल्यावर Publish वर टिचकी दिल्यावर तुमचे स्वत:चे ऑनलाईन वर्तमानपत्र प्रकाशित होईल.आता ते तुम्ही तुमच्या मित्रपरिवारास पाठवू शकता अथवा ब्लॉगवर एखाद्या दुव्यावर ठेवू शकता.अथवा widget कोड वापरून ते तुमच्या ब्लॉगच्या साईड्बार मध्ये सुद्धा समाविष्ट करू शकता.
माझ्या ब्लॉगचे असे वर्तमानपत्र पाहण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी द्या.

http://paper.li/f-1311594325

widget खाली दाखविल्याप्रमाणे दिसेल




मराठी ब्लॉगविश्वचे वर्तमानपत्र पाहण्यासाठी खाली दिलेला दुवा वापरा.

http://paper.li/f-1311595796

धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment