५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

काही तासासाठी Facebook, Twitter, Email ब्लॉक कसे कराल?

मंडळी आपला बराच वेळ Facebook, Twitter इत्यादी सोशल नेट्वर्किंग साईट वर फुकट जातो.मग दिवसातून काही तासासाठी या साईट ब्लॉक करता आल्या तर? हे शक्य आहे का? होय,हे शक्य आहे. आज आपण त्याचीच माहिती करून घेणार आहोत.

हे कसे कराल?१)यासाठी तुम्हाला गुगल क्रोम(Google Chrome browser ) ब्राउजरची गरज आहे, जर नसेल तर तो आधी तुमच्या संगणकावर प्रस्थापित करा.

२)या नंतर खाली दिलेल्या दुव्या वरून Website Blocker extension तुमच्या गुगल क्रोम ब्राउजर वर Install करा.
https://chrome.google.com/webstore/detail/hclgegipaehbigmbhdpfapmjadbaldib

३)एकदा का ते तुमच्या गुगल क्रोम ब्राउजर मध्ये प्रस्थापित झाले की त्या नंतर तुम्हाला तुमच्या ब्राऊजरच्या सर्वांत वरच्या कोपर्‍यात खाली चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे एक चिन्ह दिसेल.


त्यावर राइट क्लिक करून..option मध्ये जावून तुम्हाला Website Blocker च्या सेटिंग्स बदलाव्या लागतील.

४)असे केल्यावर चित्रामध्ये दाखविल्यामध्ये पान उघडेल.

समजा मला फेसबुक सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत ब्लॉक करायचे आहे तर मी Input मध्ये facebook.com 0900 -1700 असे लिहिन (चित्र पहा)


असे केल्याने सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत फेसबुक साईट ब्लॉक होईल. आणि कामाचा बहुमोल वेळ वाचेल :D

Title when blocked आणि Message when blocked मध्ये तुम्ही तुम्हाला हवे असलेले शिर्षक आणि संदेश लिहू शकता.


५)सेटिंग बदल्लोन झाल्यावर तुम्ही स्वत: www.facebook.com वापरायचा प्रयत्न केला तर तुम्हाला खाली चित्रात दाखविल्या प्रमाणे संदेश दिसेल.

६)ऑफिस मध्ये एखादी साईट ब्लॉक करण्यासाठी ;-) वरील पद्धत वापरल्या नंतर Chrome toolbar मधून Website Blocker चे चिन्ह लपवण्यासाठी त्या चिन्हावर Right click करून "Hide button” पर्यांयाचा वापर करा.तसेच Basic settings मध्ये Disabled of shortcut link to the options page आणि Disabled of each function control from popup page. करून तुम्ही चिन्ह आणि option नावाचा पर्यांय इतरां पासुन लपवू शकता.


७)अश्या प्रकारे तुमच्या संगणकावर गुगल क्रोम आणि Website Blocker प्रस्थापित करून घरी अथवा ऑफिस मध्ये तुम्ही ठराविक वेबसाईट ब्लॉक करू शकता,फक्त इतकी काळजी घ्या की तुमच्या संगणकावर दुसरे कोणतेही ब्राउजर असणार नाही.

अश्या अनेक नविन युक्त्या जाणून घेण्यासाठी फेसबुक वरचे पान लाईक करायला विसरू नका.

धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर


गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

  Blogger Comment
  Facebook Comment

4 comments:

 1. सर मला एकाच वेळी फोन्ट साईज आणि कलर ब्लॉग वर कसा आपल्या सोई नुसार बदलू शकतो त्याच्या कोड बद्दल जरा माहिती द्या. ही सोय मी एका ब्लॉग वर बघितली आहे त्या ब्लॉग ची लिंक मी तुम्हाला देता आहे.
  http://bhovra.blogspot.com/

  ReplyDelete
 2. ती सोय माझ्या ब्लॉग वर आहे..मी आताच तुमचा ब्लॉग पाहिला त्यावर तुम्ही ते समाविष्ट केलेले आहे.

  ReplyDelete
 3. माफ करा सर पण तो ब्लॉग माझा नसून तो माझ्या दादा चा ब्लॉग आहे आणि त्याची लिंक मी तुन्हाला उदाहरण म्हणून दिली होती.आता मी माझ्या दोन ब्लॉग ची लिंक खाली देत आहे.कृपया मला तो कोड मी माझ्या ब्लॉग वर कसा लावू या बद्दल माहिती द्यावी.
  माझ्या ब्लॉग ची लिंक :
  http://www.mankallol.blogspot.com/
  http://shrikantsketches.blogspot.com/

  ReplyDelete
 4. आज किंवा उद्या मी या विषयी लिहितो म्हणजे सर्वांना त्याचा उपयोग होईल :-)

  ReplyDelete