५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुमच्या ब्लॉगवर Shoutbox कसा समाविष्ट कराल?

 मंडळी आज आपण ब्लॉगवर Shoutbox कसा समाविष्ट करायचा याची माहिती करून घेणार आहोत. 

Shoutbox म्हणजे काय?
  Shoutbox ही तुमच्या ब्लॉग वरची अशी सुविधा आहे ज्याद्वारे तुमच्या ब्लॉगचे वाचक तुमच्या ब्लॉग बाबतच्या प्रतिक्रिया कोणत्याही खात्या शिवाय फक्त नाव आणि इपत्ता यांच्या मदतीने नोंदवू शकतात.



हा आपल्या ब्लॉगवर कसा समाविष्ट कराल ? 
१)प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी द्या.


२)जे पान उघडेल त्यावरील Sign up पर्यांयावर जा.

३)असे केल्याने खालील चित्राप्रमाणे सर्व आवश्यक बाबी भरा. उदा.Cbox name,Email address,Password,Confirm Password,Website,Language,Style

४)या नंतर I have read and do agree to the Cbox terms and conditions of service या पर्यांयाची निवड करा.मग Create my cbox पर्यांय निवडा.

५)असे केल्यावर खाली चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे संदेश दिसेल.


६) आता Login name आणि पासवर्ड वापरून Cbox साईट वर लॉग-इन व्हा.

७)जे पान उघडेल त्यातील विविध पर्यांयां पैकी Look & Feel पर्यांय निवडून हवे तसे बदल करा.

८)मग Publish! पर्यांयाचा वापर करून तुमच्या Shoutbox चे कोड मिळवा आणि कॉपी करून घ्या.

९)आता प्रथम तुमच्या ब्लॉगर खात्यावर लॉग-इन व्हा.ब्लॉगरच्या अद्यवत सुविधा या फक्त http://draft.blogger.com/ वर उपलब्ध असतात.दर वेळी त्याचा वापर करता यावा यासाठी Make Blogger in Draft my default समोर टिचकी द्या.असे केल्यावर दर वेळी ब्लॉगर.कॉम वर लॉग-इन केल्यावर तुम्ही आपोआप http://draft.blogger.com/ वर याल.

१०)या नंतर तुमच्या ब्लॉगच्या नावा समोर जे घराच्या आकाराचे चिन्ह दिसते आहे त्यावर टिचकी द्या आणि Layout पर्यांयाची निवड करा.

११)या नंतर Add a Gadget वर टिचकी द्या आणि HTML/JavaScript Add पर्यांयाची निवड करा.

१२)मगाशी जो कोड कॉपी केला होता तो या ठिकाणी पेस्ट करा. असे केल्याने तुमच्या ब्लॉगवर Shoutbox दिसू लागेल.

प्रात्यक्षिक पाहण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर जा.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

2 comments:

  1. धन्यवाद सर, आपण ब्लॉग मध्ये पोस्ट नुसार वेगळे वेगळे विभाग कसे कसे करायचे याबद्दल लिहिणार होतात. जसे तुम्ही तुमच्या ब्लॉग वर फेसबुक टिप्स, ब्लॉगिंग तंत्रमंत्र इत्यादी...
    जर तुम्ही याबद्दल लिहिलत तर मला ब्लॉग लिहिण्यासाठी भरपूर मदत होयील.
    http://shrikantsketches.blogspot.com/

    ReplyDelete
  2. घरगुती कार्यात थोडा व्यस्त असल्यामुळे लिहिता नाही आले :-)पण ब्लॉगिंगचे तंत्र-मंत्र मध्ये पुढच्या काही लेखात मी या बद्दल मी नक्की लिहिण...मी पायरी पायरीने लिहितो आहे,जेणे करून ते विस्कळितपणे कसे ही लिहिले न जाता,पद्धतशीरपणे मांडले जाईल..म्हणजे सोप्प्या कडून कठिण पद्धतीकडे हळूहळू वाटचाल सुरु होईल

    ReplyDelete