५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

वेब डिजाइनिंग शिकत आहात मग हे वापरून बघाच?

मंडळी इंटरनेटच्या या जगात अनेक वेबसाईट आहेत,त्या कश्या डिजाईन करायच्या त्याचे रितसर प्रशिक्षण सुद्धा दिले जाते..जर तुम्हाला वेबसाईट कशी बनवायची हे माहित असेल तर आज आपण ज्याची माहिती घेणार आहोत ते तुमच्या खास उपयोगाचे आहे.

समजा तुम्ही वेबडिजायनर आहात आणि एखाद्या साईटचे डिजाईन तुम्हाला आवडले तर त्याचे तुम्ही कोड पाहता पण जर त्या साईटवरच तुम्हाला हवे तसे बदल करून तुमच्या संगणकावर सेव्ह करता आले तर? हे शक्य आहे का?
तर याचे उत्तर होय असे आहे.

हे कसे कराल?१)प्रथम तुमचा वेब-ब्राउजर उघडा.
 उदा.mozila firefox,Internet Explorer,Google chrome अथवा जो तुमच्या संगणकावर असेल तो.
२)आता त्या ब्राउजरच्या address bar मध्ये(जिथे तुम्ही वेबसाईटचा पत्ता लिहिता ती जागा) तुम्हाला हव्या असलेल्या साईटचे नाव टाईप करा.

३)त्यानंतर वेब ब्राउजर मध्ये ती साईट उघडल्यावर address bar मध्ये त्या साईटच्या पत्त्याच्या जागी खाली दिलेला कोड कॉपी करून पेस्ट करा आणि इंटर वर टिचकी द्या.
javascript:document.body.contentEditable='true'; document.designMode='on'; void 0

४)असे केल्यावर तुम्ही त्या साईटचा कोणताही भाग निवडून त्यात तुम्हाला हवे तसे बदल करू शकता.

५)केलेले बदल तुमच्या संगणकावर सेव्ह करण्यासाठी Save page as पर्यांयाचा वापर करा आणि ते पान तुमच्या संगणकावर जतन करून ठेवा.

६)वेबडिजाईन करताना या पद्धतीचा वापर केल्यास बराच वेळ वाचतो आणि आपल्याला हवे ते बदल करून आपण तसेच्या तसे वेबपान बनवू शकतो.

धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

  Blogger Comment
  Facebook Comment

4 comments:

 1. माउसने कॉपी पेस्ट का?होत नाही या साईटवर

  ReplyDelete
 2. कॉपी ctrl+c करण्यासाठी पेस्ट करण्यासाठी ctrl+v चा वापर करावा...या ब्लॉग वरचे लेख कॉपी पेस्ट होवू नयेत यासाठी Right Click Protection चा वापर केल्यामुळे माऊसचा वापर करून सहज कॉपी करणे कठिण केले आहे :-)

  ReplyDelete
 3. mala website create karnyachya best software baddal information dyal ka

  ReplyDelete