५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

मोफत वेब होस्टिंग तुमच्या वेबसाईट अथवा ब्लॉगसाठी कशी मिळवाल?

मित्रानो या आधीच्या एका लेखात आपण मोफत डोमेन नेम कसे मिळवाल याची माहिती घेतली होती.
ज्याना तो लेख वाचायचा असेल त्यांनी खाली दिलेला दुवा पहावा.
तुमच्या ब्लॉगसाठी फ्री डोमेन नेम(Free Domain) कसे मिळवाल?

आजच्या लेखात आपण मोफत वेब होस्टिंग  कशी मिळवायची त्याची माहिती करून घेणार आहोत.



मोफत वेब होस्टिंग(Free Web Hosting) म्हणजे काय?
मंडळी तुम्ही जो ब्लॉग लिहिता मग तो ब्लॉगर.कॉम वर असो अथवा वर्डप्रेस वर..तो त्या त्या साईट वर होस्ट केलेला असतो.


उदा. १)http://prashantredkarsobat.blogspot.com/
    २)http://prashantredkar.wordpress.com/


पण त्याला खुप मर्यांदा आहेत.उदा. आपण php कोडिंगचा,डेटाबेसचा वापर त्यावर अमर्यांदपणे करू शकत नाही.आणि आपल्या मनाप्रमाणे त्यात बदल करू शकत नाही..दर वेळी blogspot.com अथवा wordpress.com हे त्याच्या सोबत येतेच...यावर उपाय म्हणजे स्वत:चे डोमेन नेम आणि वेब होस्टिंग विकत घेणे.सोप्प्या भाषेत सांगायचे झाले तर,"वेब होस्टिंग म्हणजे तुमची साईट अथवा ब्लॉग वरील माहिती साठवण्यासाठीची सेवा."
पण हे सर्व खर्चिक आहे...नवख्या लोकांसाठी तर त्यांना गोंधळात टाकणारे.यावर उपाय म्हणजे मोफत  वेब होस्टिंग(Free Web Hosting)चा वापर करणे.असे करून तुम्ही वेबसाईट अथवा ब्लॉग वेब होस्टिंगचा वापर करून कसा सुरु करायचा हे तर शिकणारच आहात त्या व्यतिरिकत  आयटीमध्ये वेबडिजायनिंग शिकणा‍र्‍या विद्यार्थांना प्रात्यक्षिक करून पाहण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होईल.चला तर मग आज आपल्या ब्लॉग अथवा साईट साठी मोफत होस्टिंग सेवा मिळवू या.

हे कसे कराल?

१)प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर जा.

free-web-hosting



२)तिथे गेल्यावर तुम्हाला signup नावाचा पर्यांय दिसेल त्यावर टिचकी द्या.

३)जे पान उघडेल त्यातील Sub-Domain समोर तुम्हाला तुमच्या साईटसाठीचे नाव निवडावे लागेल...त्याची पुर्तता करा.
उदा.    अबक.00000web.info  
यानंतर आवश्यक बाबींची पुरता करून Register पर्यांयावर टिचकी द्या.


४)असे केल्यावर एक पडताळणी करणारा मेल तुमच्या इपत्यावर पाठवला जाईल.बहुतेक वेळा तो मेल तुमच्या इमेल खात्याचा spam फोल्डर मध्ये जातो..तिथे जावून तो दुवा उघडा आणि त्यातील पडताळणीसाठीच्या दुव्यावर टिचकी द्या.


५)असे केल्यावर जी विंडो उघडेल त्यात तुम्हाला काही कोड नोंदवायला सांगुन, तुम्ही खरच माणूस आहात का? की सॉफ्ट्वेअर द्वारे हे होते आहे त्याची पडताळणी केली जाईल.

६)ही चाचणी यशस्वी झाल्यावर

तुमच्या इमेल खात्यावर मोफत  वेब होस्टिंग सेवेची सर्व आवश्यक माहिती पाठवली जाईल.ती माहिती आणि मेल जतन करून ठेवा.


त्याचा वापर करून तुमचा ब्लॉग अथवा साईट कशी होस्ट करायची याची माहिती आपण पुढील काही लेखांमध्ये करून घेणार आहोत.

धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

2 comments:

  1. Google ne .co.cc chya sarv site search list madhun kadhun taklya ahet.
    Kedar
    www.tuljabhavani.in

    ReplyDelete
  2. हो पण फ़्री डोमेन टेस्टिंगसाठी त्या अजुनही उपयोगी आहेत.तसेच .tk डोमेन नेम सुद्धा मोफत आहेत त्यानेही काम चालू शकते. marathisocial.tk गुगल सर्च मध्ये बघ मिळते का? :-)

    ReplyDelete